Land Record Department

Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी

Land Record Department शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपल्याला हद्द कायम मोजणी, भूसंपादन संयुक्त मोजणी, निमताना मोजणी, पोटहिस्सा मोजणी, कोर्ट कमिशन मोजणी, कोर्ट वाटप मोजणी, बिनशेती मोजणे अशा विविध प्रकारच्या जमिनीच्या मोजण्या गरजेनुसार करून घेता येतात. प्रत्येक मोजणीकरिता काही वेगवेगळे नियम आहे. हेच आपण जाणून घेणार आहोत.

शेतजमिनीची हद्द जमिनीचा बांध कायम करण्याकरिता हद्द कायम मोजणी हा पर्याय आहे. हद्द काय मोजणी ही शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून दिली जाणारी मोजणी आहे. जमिनीच्या पोटीहिस्स्या बाबत अतिक्रमण व इतर विविध कारणामुळे हद्द नष्ट होणे यामुळे वाद उद्भवतात. हद्द कायम मोजणी करून आपल्याला आपल्या जमिनीची हद्दपारक मिळविता येते.

Land Record Department

हद्द कायम मोजणी कुणामार्फत केल्या जाते.

 • हद्द कायम मोजणी ही शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाते.
 • तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे रीतसर अर्ज केल्यानंतर तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून हद्द कायम मोजणी करून दिल्या जाते.

हद्द काय मोजणी करिता फी ही भरावी लागते का?

 • हद्द कायम मोजणी करण्याकरिता फी ही भरावी लागते.
 • भूमी अभिलेख कार्यालयाने प्रति एकर ठरवलेली फी भरून चलान कार्यालयाकडे जमा करावी लागते.
 • त्यानंतर हद्द कायम मोजणी ही तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून करून दिल्या जाते.

जमिनीचे जुन्यातले जुने कागदपत्रे डाउनलोड करा

Land Record Department हद्द कायम मोजणी करिता कोणकोणती कागदपत्रे लागतात

 • हद्द कायम मोजणी अर्ज
 • विहित नमुन्या मधील अर्ज हा तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे हा भरून द्यावा लागतो.
 • अर्ज सुद्धा तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्येच त्या ठिकाणी उपलब्ध असतो.
 • अर्ज हा कोर्ट फी स्टॅम्प सही असावा.
 • मोजणी करायच्या जमिनीचा सातबारा उतारा
 • हद्द कायम मोजणीची जमिनीच्या मोजणी क्षेत्रानुसार भरल्याचे चलन.
 • ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा, व नकाशामध्ये जमिनीच्या कोणत्या बाजूकडे हद्दीबाबत तक्रार आहे व ती हद्द कायम करून हवी आहे याची माहिती.
 • जमिनीला लागून असलेल्या सर्व खातेदारांची नावे व त्यांचा पत्ता अर्जदाराचे आधार कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • इत्यादी

हद्द कायम मोजणीची प्रक्रिया

 • तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे मोजणी अर्ज दाखल केल्यानंतर मोजणी रजिस्टर क्रमांक पोच पावती दिल्या जाते.
 • भूमि अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध असलेले मूळ टिपण किंवा फाळणी उतारे काढून अर्जाला जोडले जातात.
 • पुढे हा अर्ज सर्वे पुढील प्रक्रिये करिता दिल्या जातो.
 • हद्द कायम मोजणी ज्या जमिनीची करायची आहे त्या जमिनीच्या लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या किमान पंधरा दिवस आधी रजिस्टर पोस्टाने मोजणी बाबत नोटिसा पाठवल्या जातात.
 • नोटीस मध्ये नमूद तारखेला जमिनीची मोजणी करण्याकरिता सर्वेअर मोजणी करायच्या ठिकाणी येतात.

जाणून घ्या काय असते वंशावळी?

जमिनीचे मोजणी सर्वे प्रत्यक्ष कशा पद्धतीने करतो
 • मोजणी करिता नियुक्त सर्वेर सर्वप्रथम च्या जमिनीची मोजणी करायची आहे त्यात जमिनीची पाहणी करतो.
 • पाहणी करत असताना अर्जदाराकडून प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याची सुद्धा माहिती सर्वेकडून घेतली जाते.
 • पाहणी करून जमिनीच्या प्रत्यक्ष वहिवाटीची हद्द लक्षात यावी म्हणून कच्च्या खुणा या केल्या जातात.
 • जमिनीच्या बांधाच्या जुन्या खुणा विचारात घेऊन मोजणीला प्रत्यक्ष सुरुवात केली जाते.
 • आधीच्या काळामध्ये प्लेन टेबल पद्धतीने मोजणी केल्या जात होती मात्र आता त्या ऐवजी आधुनिक रोवर यंत्राच्या साह्याने मोजणी केल्या जाते.
जमिनीची मोजणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय
 • अतिक्रमण करणारी शेजारील व्यक्ती मोजणीकरिता गैरहजर राहणे.
 • मोजणी ज्या दिवशी आहे त्या दिवशी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी लगतचे शेतकरी गैरहजर राहतात, अशा वेळी लगतची व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर जरी असली तरी मोजणी करता येते.
 • मोजणी बाबतची भूमि अभिलेख कार्यालयाकडून दिलेली नोटीस त्या व्यक्तीने स्वीकारलेली असावी अथवा स्वीकारायला नकार दिलेला असावा रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आलेली असल्याकारणाने नोटीस स्वीकारली अथवा नाकारली याची पोहोच परत भूमि अभिलेख कार्यालयाकडे दिल्या जाते.

मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

Land Record Department मोजणी पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया
 • रोवर अथवा प्लेन टेबल पद्धतीने मोजणी केल्यानंतर जमिनीचा प्रत्यक्ष नकाशा तयार होतो.
 • तो नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडे असलेल्या मूळ नकाशासोबत तुलना करून जमिनीची हद्द ठरविल्यास जाते.
 • यामुळे बऱ्याचदा लगेचच हद्दीच्या खुणां न दाखवता मूळ रेकॉर्डच्या नकाशा सोबत तुलना करून काही दिवसानंतर हद्द दाखविल्या जाते.
 • मोजणीच्या दिवशी संपूर्ण मोजणी झाल्यानंतर सर्वर मोजणी वेळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे व लगतच्या खातेदारांचे लेखी जबाब घेऊन पंचनामा तयार करतात.
 • एखाद्याने जबाब देण्यास नकार दिल्यास अथवा पंचनामेवर सह्या देण्यास नकार दिल्यास पंचनाम्यात त्याची रीतसर नोंद केल्या जाते.
मोजणीनंतर प्रत्यक्ष हद्द दाखविण्याची प्रक्रिया व नकाशाच्या प्रती
 • Land Record Department जमिनीची हद्द कायम मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला म्हणजेच ज्याने मोजणी करिता अर्ज केला होता त्याला हद्द दाखविल्या जाते व तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात.
 • त्या नकाशावरून मोजणी करिता अर्ज केलेल्या अर्जदाराचे नाव मोजणी दिनांक सर्वेचे नाव व सही हद्द अर्जदाराला दाखविल्याचा दिनांक सही शिका इत्यादीची माहिती असते.
 • मोजणी नंतर प्रत्यक्ष हद्द आणि मुळु नकाशा सोबत तुलना करून येणारी हद्द वेगवेगळे असेल अशावेळी वहिवाटीचे हद्द तुटक तुटक रेषेने व रेकॉर्ड प्रमाणे येणारी हद्द सलग रेषेने नकाशावरती दाखविल्या जाते.
 • अतिक्रमण असल्यास अतिक्रमित भागाचे क्षेत्र रंगीत पेनाने रंगवून दाखविल्या जाते.
 • नकाशावरील तुटकरेषा ही वहिवाटीची हद्द असते तर सलगरेषा ही अभिलेखात दर्शविलेली हद्द असते.
“क” प्रत
 • शेवटी अर्जदाराला हद्द कायम नकाशा ज्याला “क” प्रत असे म्हंटले जाते ती दिल्या जाते.

Instant Loan On Adhar Card :आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

Magel Tyala Yojana 2023 :शासनाचा मोठा निर्णय, आता मागेल त्याला योजना

19 thoughts on “Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी”

 1. Pingback: Health Update :रोजच्या आहारात तूप खाणे किती फायदेशीर आणि किती नुकसानदाई जाणून घ्या एका क्लिक मध्ये - newsifymarathi

 2. Pingback: Pack House Subsidy :पॅक हाऊसला मिळणार 2 लाखचे अनुदान - Atharvarohi

 3. Pingback: Krushi Yantrikikarn Yojana :कृषि यांत्रिकीकरणचा नवीन सरकारी निर्णय जाहीर - Krushisamrat

 4. Pingback: Krushi Yantrikikarn Yojana :कृषि यांत्रिकीकरणचा नवीन सरकारी निर्णय जाहीर - Indien Farmer

 5. Pingback: Nashik Municipal Corporation Recruitments :नोकरभरतीस हिरवा कंदील - Indien Farmer

 6. Pingback: May New Rules : १ मेपासून देशभरात लागू होणार नवा नियम, ५ मोठे बदल, सर्वांनी लक्ष देणे आवश्यक - newsifymarathi.com

 7. Pingback: Maharashtra Land Rate Valuation :जमिनीचे शासकीय भाव तुमच्या मोबाइल वर पाहा | Shetiyojana

 8. Pingback: Ration card News:आता देशभरातील रेशनकार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, देशभरात नवीन नियम लागू, पहा संपू

 9. Pingback: Summer Tips in Marathi: उन्हाळ्यात अंडी किती वेळा खावी? व अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या - newsifymarathi.com

 10. Pingback: Gut Health:अन्न चांगले पचण्यासाठी पोट निरोगी असणे महत्त्वाचे आहे.ते कसे जाणून घेऊया - newsifymarathi.com

 11. Pingback: Maharashtra Land Record :1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा - Atharvarohi

 12. Pingback: 5 Health Benefits Of Peas :मटारचे 5 आरोग्य फायदे - newsifymarathi.com

 13. Pingback: Stomach Cleansing Juice : 3 नैसर्गिक रस आतड्यातील घाण साफ करतील, बद्धकोष्ठता आणि गॅसपासूनही सुटका मिळेल, आजच करून

 14. Pingback: Virat & Naveen Fight :स्पोर्ट्स ग्राऊंडच्या लढतीनंतर नवीनने इन्स्टावर काय लिहिले, आता युद्ध लांबणार! - newsifymarathi

 15. Pingback: Ajwain Seeds in Morning:सेलरीच्या(ओवा) बिया पाचक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात आणि हे बियाणे तुमच्या

 16. Pingback: 5 high-protein vegetable:5 हाय-प्रोटीन भाज्या ज्या अंडी खाल्ल्यासारख्या आहेत - newsifymarathi.com

 17. Pingback: Salokha Yojana 2023 :आता रजिस्ट्री होणार फक्त दोन हजार रूपयात - Indien Farmer

 18. Pingback: Tukde Bandi Latest Update :तुकडेबंदी वर सरकारचा धक्कादायक निर्णय - Krushisamrat

 19. Pingback: Maharashtra Land Rate Valuation :जमिनीचे शासकीय भाव तुमच्या मोबाइल वर पाहा - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!