Land Record Nominee

Land Record Nominee :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची

Land Record Nominee शेतजमिन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीचा हक्क मिळू शकतो. पण त्यासाठी शेत जमिनीवर वारसांची नोंद करणे आवश्यक असतं. आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो यापेक्षा अधिक काळ उठल्यास विलंब शुल्क आकारला जातो.

हा अर्ज करण्यासाठी सामान्य माणसांना शेतकऱ्यांना तलाठी कार्याला जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ईहक्क या प्रणाली द्वारे सामान्य नागरिक घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदीसाठी अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकारची हक्क प्रणाली नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Land Record Nominee

ई-हक्क प्रणाली काय आहे.

  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या हेतून ही हक्क प्रणाली सुरू केली आहे.
  • तलाठी कार्यालय मध्ये जी अर्ज दाखल करावी लागतात फेरफार घेण्यासाठी ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याची जी प्रणाली आहे.
  • यामध्ये वारस नोंदवणं
  • ई कर नोंदवणं
  • भुजाचे नोंद दाखल करने
  • भुजाची नोंद कमी करणे
  • मयताचे नाव कमी करणे
  • या प्रकारचे आठ ते नऊ अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करता येतात.
  • आणि कागदपत्रे देखील अपलोड करता येतात.

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • हा अर्ज करण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in सर्च करायचा आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल सातबारा दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली अशी ही सूचना असून त्याखाली एक लिंक दिलेली आहे.
  • लिंक वर क्लिक करा.
  • समोर पब्लिक डेटा एन्ट्री नावाने एक पेज ओपन होईल.
  • यावरील प्रोसेड टू लॉगिन या पर्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला आधी तुमचा अकाउंट सुरू करायचा आहे त्यासाठी क्रिएट न्यू यूजर यावर क्लिक करायचा आहे.
  • न्यू युजर साइन अप नावाचा नवीन पेज उघडेल तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव टाकायचा आहे.
  • लॉगिन डिटेल्स मध्ये युजरनेम टाकून चेक अवेलेबिलिटी या पर्यावर क्लिक करा.
  • पासवर्ड टाकून तो परत एकदा टाका नंतर सेक्युरिटी क्वेश्चन मध्ये जे काही प्रश्न आहेत त्यातील एक प्रश्न निवडून त्याचे उत्तर द्या.
  • तिथे तीन ते चार प्रश्न असतात सोपे असतात त्यातल्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता.
  • ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर, आणि पिन कोड टाका.
  • पिन कोड टाकला की राज्य जिल्हा त्याचं नाव आपोआप येतो.
  • सिलेक्ट सिटी मध्ये तुमचं गाव निवडा. त्यानंतर ऍड्रेस डिटेल्स मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.
  • शेवटी कॅपच्या मध्ये दिसणारे आकडे किंवा अक्षर जसेच्या तसे
  • दिलेल्या ठिकाणी टाईप करा आणि सेव बटन दाबा.
  • पेजवर खाली रजिस्ट्रेशन सक्सेसफुल प्लीज रिमेंबर युजरनेम अंड पासवर्ड फोर फ्युचर ट्रांजेक्शन असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल.

लिंक वर जाण्यासाठी क्लिक करा

Land Record Nominee ई-हक्क प्रणाली

  • बॅक या पर्यावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉगिन करा.
  • नोंदणी करताना टाकलेला युजरनेम आणि पासपोर्ट टाकून कॅपचा टाका आणि लॉगिन करा.
  • डिटेल्स नावाचा एक पेज नवीन पेज समोर उघडेल.
  • रजिस्ट्रेशन मॅरेज ई फीलिंग सातबारा म्युटेशन असे वेगवेगळे पर्याय दिसतील.
  • तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • सात बारा म्युटेशन्स या पर्यायावर क्लिक करा.
  • युजरचा प्रकार निवडा सामान्य नागरिका असाल तर यू जरी सिटीजन आणि बँकेचे कर्मचारी असाल किंवा बँकेसंबंधी काम करणारा असाल तर युजर इज बँक या पर्यावर क्लिक करा.
  • प्रकार निवडल्यानंतर प्रोसेस या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर फेरफार अर्ज प्रणाली ई हक्क नावाचं पेज ओपन होईल.
  • सुरुवातीला गावाची माहिती भरा जिल्हा तालुका आणि गाव निवडा.
  • तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा.
  • वारस नोंद करायची असल्यामुळे आपण वारस नोंद हा पर्याय निवडा.
  • वारस फेरफार अर्ज समोर ओपन होईल.
  • सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्या यात अर्जदाराचं नाव वडील किंवा पतीचे नाव आणि आडनाव त्यानंतर अर्जदाराचा ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे जा या पर्यावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर आपला अर्ज मसुदा जतन केला आहे असा मेसेज दिसेल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल.
  • या मेसेज खालील ओके या बटणावर क्लिक करा.

लिंक वर जाण्यासाठी क्लिक करा

Land Record Nominee

  • मैताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका सातबारा वरील खाते क्रमांक टाकण अपेक्षित आहे.
  • पुढे खातेदार शोधा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर मैताचं नाव निवडा.
  • एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदारांच्या नावे असलेल्या गट क्रमांक तिथे येतो तो निवडा.
  • नंतर मृत्यू दिनांक टाका त्यानंतर समाविष्ट करा या पर्यावर क्लिक करा.
  • पुढे निवडलेल्या खातेदारक्याच्या जमिनीची सविस्तर माहिती पाहायला मिळेल.
  • त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का असा प्रश्न तिथे विचारण्यात येईल.
  • वारसांपैकी असाल तर होय आणि नसाल तर नाही या पर्यावर क्लिक करा.
  • वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करा. आता वारस म्हणून जे नाव लावायचे आहेत त्यांची माहिती भरा.
  • यात नाव वडील किंवा पतीचे नाव आडनाव लिहा पुढे धर्म निवडा.
  • तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियमित्व लावले जातात किंवा पाळले जातात.
  • इंग्रजीत नाव लिहा आणि जन्मतारीख टाका. वय तिथे आपोआप येईल.
  • पुढे मोबाईल नंबर आणि पिन कोड टाका पिन कोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचे नाव तिथं आपोआप येऊन जाईल.
  • पुढे पोस्ट ऑफिस निवडा त्यानंतर तालुका गाव घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाका.
  • मयताशी असलेलं नातं निवडा मुलगा, मुलगी, पत्नी, नातू, नात, सून यापैकी जे नातं असेल ते निवडा.
  • यापैकी नातं नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यावर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर शेवटी साठवा या पर्यावर क्लिक करा.
  • रकान्याचा वारसा संदर्भात जी माहिती भरली ती दिसेल.
  • जर तुम्हाला अधिक वारसांचे नाव तिथे जोडायचे असेल तर तिथे असलेल्या पुढील वारस या पर्यावर क्लिक करा आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसा संदर्भात भरा.
  • सर्व वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यावर क्लिक करा.
  • कागदपत्रे जोडा.

प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

लागणारी कागदपत्रे
  • मृत्यू दाखल्याची सत्यप्रत
  • ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते
  • इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देणारे
  • रेशन
  • मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीच्या ८अ उतारे
  • तसेच एका कागदावर एक शपथ पत्र लिहून ते इथे जोडणे अपेक्षित असतं.
  • यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.
  • Land Record Nominee कागदपत्रे जोडल्यानंतर फाईल अपलोड झाली असा मेसेज येईल.
  • त्यानंतर एक स्वयंघोषणापत्र दिसेल अर्जात दिलेली.
  • माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहीत असलेले कोणतेही बाब लपून ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही असे केले असल्यास मी भारतीय दंड सेवितेची वेगवेगळी कलम आहे त्या कलमान्वये कारवाईक आम्ही पात्र राहील याची मला जाणीव आहे.
  • सगळ्यात शेवटी या पत्राच्या खाली सहमत आहे किंवा ॲग्री या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जातो.
  • तिथे या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून तुमच्या सातबारावर वारसांची नावं नोंदवली जाते.

Fake Rupee Notes :कश्या ओळखायच्या 500 आणि 2000 नोटा

Bailgadi Anudan Yojana :बैलगाडी अनुदान योजना

11 thoughts on “Land Record Nominee :मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची”

  1. Pingback: Protsahan Anudan List :50 हजार अनुदान योजनेची यादी जाहीर - Krushivasant

  2. Pingback: Land Record Partition :जमिनीची वेळेवर वाटणी केली नाही तर होईल मोठी समस्या - Atharvarohi

  3. Pingback: Bij Bhandaval Anudan :व्यवसायासाठी सरकार देणार पैसे आताच करा अर्ज - Indien Farmer

  4. Pingback: Saur Krishi Vahini Yojana :प्रत्येक शेतकरी होणार लखपती - Krushisamrat

  5. Pingback: Cotton Market Rate Update : ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव - Indien Farmer

  6. Pingback: Cotton Market Rate Update : ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव - Krushisahayak

  7. Pingback: Tushar Sinchan Yojana :जाणून घ्या कसा करायचा अर्ज - Atharvarohi

  8. Pingback: Cotton Market Rate Update : ह्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 8500रु. भाव - Krushivasant

  9. Pingback: Senior Citizens Schemes :60 ते 80 वयोगटतील जेष्ठनागरिकांना फायदेशीर ठरणारे सरकारी योजना. - Krushisamrat

  10. Pingback: Land Record Department :हद्द कायम मोजणी कशी करावी - Indien Farmer

  11. Pingback: Property Rights :पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का? - Atharvarohi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!