Small Saving Scheme 2023

Small Saving Scheme 2023 :महिलांसाठी नव्या व्याजदारसोबत नवी योजना

Small Saving Scheme 2023 कमी कालावधीसाठी गुंतवणूक सरकारची गॅरंटी आणि फिक्स व्याजदर अशा प्रकारचे योजनेमध्ये जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर हे तुमच्यासाठीच आहे. ही योजना कोणती आहे त्यातील व्याजदर किती आहे कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तुम्हाला खाते उघडता येते खाते उघडले असेल तर ते तुम्हाला प्री मॅचेवर कसे क्लोज करता येईल तसेच किती रकमेची गुंतवणूक तुम्हाला करता येईल इतर सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Small Saving Scheme 2023

अंबलबजवणी

  • एक फेब्रुवारी 2023 च्या बजेटमध्ये खास महिलांकरिता एक स्मॉल सेविंग स्कीमची अनाउन्समेंट झालेली आहे.

योजनेचे नाव

  • महिला सन्मान बचत पत्र म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट.
  • जर तुमच्या घरातील महिलांच्या नावे किंवा लहान मुलींच्या नावाने तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते.
  • कारण या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या नावाने किंवा लहान मुली असतील तर त्यांच्या नावाने त्यांच्या पालकांना देखील खाते उघडता येते.
  • या योजनेअंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये आणि एक हजार रुपयांच्याच पटीमध्ये तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते.
  • या योजनेअंतर्गत जास्तीच्या गुंतवणुकीची मर्यादा ही दोन लाख रुपये आहे.
  • म्हणजे योजनेमधील सर्व खाते मिळून एकत्रित रक्कम ही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
  • याचा अर्थ तुम्हाला या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या रकमेसाठी वेगवेगळे खाते उघडता येते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Small Saving Scheme 2023 अटी

  • पहिले खाते तुम्ही उघडले असेल आणि दुसरेही खाते तुम्हाला उघडायचे असेल तर या दोन्ही खात्यांमध्ये कमीत कमी तीन महिन्यांचा अंतर असणे गरजेचे आहे.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षांपूर्वी झाल्यानंतर जर तुम्हाला काही रक्कम काढायचे असेल तर त्यावेळी तुम्हाला पात्र शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत रक्कम परत काढता येते.
  • या योजनेचा कालावधी हा फक्त दोन वर्षांचा आहे.
  • ज्यामुळे खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील दोन वर्षे पूर्ण होतात तुम्ही जमा केलेले रक्कम आणि त्यावर जनरेट झालेले व्याज एकत्रितपणे तुम्हाला परत केले जाते.

व्याज किती

  • Small Saving Scheme 2023 महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत 7.5% वार्षिक व्याजदर दिला जातो.
  • हा व्याजदर इतर कुठल्याही फिक्स डिपॉझिट पेक्षा अधिक आहे.
  • या इंटरेस्ट रेट नुसार व्याज हे दर तीन महिन्याला कंपाउंड केले जातात.
  • म्हणजेच चक्रवाढ करून तुमच्या खात्यावर जमा केले जाते आणि ज्यावेळी खाते मॅच होते त्यावेळी ती सर्व रक्कम तुम्हाला परत केली जाते.

महत्वाची बातमी

उघडण्यासंदर्भात महत्वाची माहिती
  • अकाउंट ओपनिंग संदर्भात पोस्ट ऑफिस ने एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे.
  • जर खाते योजनेच्या नियमांचे पालन न करता उघडण्यात आले असेल किंवा त्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली असेल.
  • तर त्या रकमेवर पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंट चे व्याजदर लागू होतील.
  • जर तुम्हाला या योजनेअंतर्गत असलेले 7.5% दराने व्याज हवे असेल तर योजनेच्या नियमांचे पालन करूनच खाते उघडा.
  • योजनेचा कालावधी हा कमी आहे परंतु या दोन वर्षात किंवा दोन वर्षात पूर्ण होण्याअगोदरच काहीही कारणास्तव तुम्हाला जर योजनेतून बाहेर पडायचे असेल आणि तुमचे पैसे परत हवे असतील तर त्यासाठी काहीच स्पेसिफिक नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
Small Saving Scheme 2023 नियम
  • जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्यावेळी खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
  • त्याचप्रमाणे जर एखादा जीवघेणा आजार खातेधारकाला झाला असेल तसेच जर खातेदार मायनर असेल म्हणजे मुली लहान असतील व त्यांच्या नावाने त्यांच्या पालकांनी खाद्य उघडले असेल परंतु त्या पालकांचा मृत्यू झाला असेल.
  • तर अशावेळी योग्य कागदपत्रांचे सबमिशन करून तुम्हाला खाते मुदतपूर्वक बंद करता येते.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यानंतर जर कुठलेही कारण न देता तुम्ही खाते बंद करणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये जो काही व्याजदर योजनेमध्ये लागू असतो त्याच्यापेक्षा दोन टक्के कमी दराने तुम्हाला व्याज दिले जाते.
  • म्हणजे 7.5% हा व्याजदर आहे परंतु त्या कालावधीसाठी दोन टक्के कमी म्हणजे 5.5% दराने तुम्हाला व्याजदर केले जाईल.

सर्वांना मिळणार मोफत सायकल

नवीन खाते
  • Small Saving Scheme 2023 महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर ते तुम्हाला ऑफलाइन मोडमध्ये कुठल्याही किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडता येते.
  • त्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
कागदपत्रे
  • खाते उघडण्यासाठी लागणारा अर्ज
  • केवायसी डॉक्युमेंट
  • आधार कार्ड
  • ओपनिंग फॉर्म
  • पॅन कार्ड
  • नवीन खातेधारकासाठी केवायसी फॉर्म
  • जी रक्कम जमा करणार असाल त्याची पे इन स्लिप मुळ रक्कम किंवा त्या रकमेचा चेक.
  • हे सर्व कागदपत्र तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचे आहेत.

Farming Tips :उन्हाळी कोथिंबिर लागवड कशी करावी.

Land Record Updates :८ अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन.

3 thoughts on “Small Saving Scheme 2023 :महिलांसाठी नव्या व्याजदारसोबत नवी योजना”

  1. Pingback: Fake Rupee Notes :कश्या ओळखायच्या 500 आणि 2000 नोटा | Shetiyojana

  2. Pingback: Bank Update :एफडी करताना या गोष्टी लक्षात ठेवा - Krushivasant

  3. Pingback: Jerenium Farming :शेतकऱ्याला करोडपती करणारी शेती | Shetiyojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!