High Temperature राज्यात अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला असला तरी काही भागात सूर्य आग ओकत आहे, त्यामुळे उष्मघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे तसेच ह्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्मघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 600 लोक उपचाराधीन आहेत.
उष्माघाताची लक्षणे काय व ह्यावरती उपाय कोणते?
उष्माघात झाल्यावर सुरुवातीला चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही सामान्य लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र रुग्णाला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
आधार फसवणूक होण्यापूर्वी चेक करा
High Temperature उपाय काय कराल?
- बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळावं.
- रणरणत्या उन्हात बाहेर इकडे-तिकडे फिरणे टाळावं.
- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळा किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.
- सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरण्यावर भर द्यावा.
- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.
- अंगात उष्णता निर्माण होईल असा आहार घेणं शक्यतो टाळावा.
- भरपूर पाणी प्यावं. थंडगार सरबत प्यावं.
- उष्माघाताची लक्षणं सुरु होताच ताबडतोब डॉक्तरांचा सल्ला घ्या.
High Temperature एकंदरीत आग ओकणाऱ्या उन्हात बाहेर जास्त फिरण्याची हिम्मत करू नये, गरज असेल तरचं दुपारी उन्हात बाहेर पडा, भरपूर पाणी प्या आणि आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्या.
आरोग्य संबंधित सगळी माहिती एकाच ठिकाणी
VanRakshak Mega Bharti :वनरक्षक भरती 2023
Small Saving Scheme 2023 :महिलांसाठी नव्या व्याजदारसोबत नवी योजना
Pingback: Mahsul Vibhag :महसूल विभाग 13000 पदासाठी मेगा भरती - Krushisamrat
Pingback: Maharashtra Budget 2023 : पीक विमा बंद आता मिळणार शासनाचे अनुदान - Atharvarohi
Pingback: Mahsul Vibhag :महसूल विभाग 13000 पदासाठी मेगा भरती - Krushisahayak