land record maharashtra : आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार

land record maharashtra : लोकांनी काही म्हणू द्या आमच्या जगू तात्यानं लय रॉयल आयुष्य जगलं. गावात राहून सुद्धा तात्यानं बिना इस्त्रीचे कपडे कधी घातले नाहीत. तात्यानं कधी दारी धरली नाहीत की कधी म्हशी पुढचं शेण सारलं. बरं तात्याच राजेशाही जगत होता असं नाही त्याला समर्थ साथ द्यायच्या त्या त्यांच्या सौभाग्यवती हिराकाकू. तात्यानं पण हिरकाकूला मागेल ते कधीच कमी पडू दिलं नाही. त्यामुळं हिराकाकू बालेर पण तशीच वागायची. लग्नात जर काकूला नऊवारी सोडून जर दुसऱ्या साडीचा आहेर झाला तर काकू भरमांडपात वरमाईचा पाणउतारा करायची. आणि हा सगळा रॉयल कारभार चालायचा शेतीतून १ रुपया उत्पन्न नसताना. मग तात्या एवढे पैसे कुठून आणायचा तर दर वर्षी ४-५ गुंठा जमीन विकून. मारुती आबाचा एकुलता एक लेक असल्यानं जगू तात्याला चिक्कार जमीन मिळाली होती. तीच जमीन विकून तात्या आयुष्य जगत होता.

पूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा

  • महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले होते.
  • त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते.
  • त्यासाठी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ मध्ये एक परिपत्रक काढलं होतं.
  • त्यानुसार महाराष्ट्रात १, २, ३ अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आऊट करणं आवश्यक होतं.
  • नाहीतर जमीन खरेदी करूनही त्याची दस्त नोंदणी होणार नव्हती म्हणजेच विकत घेणाऱ्याच्या नावावर ती जमीन होणार नव्हती.
  • त्यामुळे आता राज्यांत गुंठ्यांमध्ये शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असून त्यांची दस्त नोंदणीही होणार आहे.

Land And Property Transfer : 100 रुपयांत करून घ्या शेत नावावर

land record maharashtra : एनए करण्याची प्रक्रिया करणं किती अवघड होती हे शेती असणाऱ्यांना माहित आहेच. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना जमीन विकायची आहे त्यांना याचा फायदा होणार आहे. आता ज्यांना एनए प्रक्रिया काय असते हे माहित त्यांच्यासाठी पाहिलं ते समजून घेऊ काय एनए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल. शेतजमिनीचा जेव्हा शेतीसोडून दुसऱ्या बिगरशेतकी कामासाठी उपयोग करायचा असतो तेव्हा कायदेशीर परवानगी घ्यावी लागते म्हणजेच एनए करावा लागतो.

जाणून घ्या काय आहे अटी

मात्र राज्यसरकारने हे तुकडे बंदीबाबतच नवीन परिपत्रक का आणलं होतं?

आता का आणला होतं हे समजून घेण्याचा आत नेमकी तुकडेबंदी काय असते ते माहित पाहिजे. तुकडेबंदी म्हणजे या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेली जमीनीचा तुकडा विकण्यास बंदी. शेतीच्या प्रकारानुसार प्रमाणभूत क्षेत्र वेगळं असतं. वरकस जमीन किव्हा जिरायत जमीन आणि बागायत जमीन या जमिनीच्या प्रकारानुसार तुकडेबंदी- तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, 1947 नुसार प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे.

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार

Panjabrao Dakh : 14 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

4 thoughts on “land record maharashtra : आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार”

  1. Pingback: Gai Gotha Anudan : गाय गोठा अनुदान योजना - Indien Farmer

  2. Pingback: ST bharti : महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटीमध्ये भरती सुरू - Indien Farmer

  3. Pingback: Electric vehicles update पुढील ५ वर्षात पेट्रोल/डिझेल- नितीन गडकरी - Atharvarohi

  4. Pingback: MSRTC Bharti : महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटीमध्ये भरती सुरू - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!