Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू

Financial Year Update 2023 नवीन वर्ष सुरू झाले आहे. कॅलेंडर नाही तर आर्थिक वर्ष ज्याला पण फायनान्शियल येर असे देखील म्हणतो जे एप्रिल ते मार्च या कालावधीच असत.

दर वर्षी भारत सरकार मार्फत जे बजेट सादर केले जाते त्यामध्ये करण्यात आलेले बदल, जाहीर झालेले नवीन नियम हे सर्व एक एप्रिल पासून लागू केले जातात.

त्याच प्रमाणे काही असेही बदल असतात जे बजेट दरम्यान घोषित केले जात नाहीत पण वेगवेगळ्या मंत्र्यामार्फत तसेच विभागामार्फत ते लागू केले जातात. तर ह्या वर्षी १ एप्रिल २०२३ पासून काय बदल होणार आहे ते जाणून घेऊया.

१ पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

 • Financial Year Update 2023 पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात दरवर्षी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याबाबत सरकारकडून सूचना दिल्या जातात.
 • परंतु आता जून 2022 नंतर आधार पॅन लिंक करायचे असेल तर 1000 रुपये भरूनच ते करता येणार आहे.
 • तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की 31 मार्च 2023 पूर्वी आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड कुठल्याही कामाचे राहणार नाही.
 • तुमचे बँकेसंबंधीची कामे थांबविले जातील जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट येणार असेल तर ते देखील थांबवले जाऊ शकते.
 • कुठलेही कर्ज घेताना इएमआय ऑप्शन निवडताना गरजेचे असते ते पॅन कार्ड आणि तेच बंद झाले तर किती अडचणी येऊ शकतात याची कल्पना आपण करू शकतो.
 • पान आधार ला लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • जर तुमचे पॅन कार्ड आणि पीएफ अकाउंट एकमेकांची लिंक नसेल
 • तसेच पीएफ अकाउंट उघडल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होण्यापूर्वीच अकाउंट मधील पैसे काढणार असाल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो.
 • आतापर्यंत अशा परिस्थितीत 30 टक्के टॅक्स अकारला जात होता परंतु एक एप्रिल पासून हा दर कमी करण्यात आला असून आता वीस टक्के टॅक्स अकारला जाऊ शकतो.
 • जर तुमचे पीएफ अकाउंट आणि पॅन नंबर लिंक असेल तर असा कुठलाही टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही
 • त्यामुळे जर पण आणि पीएफ अकाउंट लिंक करायचे असेल तर ते तुम्हाला दोन प्रकारे करता येऊ शकते.
 • १ तुमच्या ऑफिस मधील अकाउंट डिपार्टमेंट मध्ये तपास करा ज्या ठिकाणी तुमचे काम करून दिले जाईल.
 • अथवा ते कसे करायचे याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल.
 • एपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून अकाउंट मॅनेजमेंट सेक्शन मध्ये तुमचे केवायसी अपडेट करून घ्या.

आधार पान लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

२ Financial Year Update 2023 जेष्ठ नागरिक बचत योजना

 • जेष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अंतर्गत या आदी सिंगल अकाउंट मध्ये डिपॉझिट लिमिट जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांची होती.
 • जे आता एक एप्रिल 2023 पासून 30 लाख रुपये करण्यात आलेली आहे.
 • या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना वार्षिक आठ टक्के व्याज मिळते जनरेट होणारे व्याज दर तीन महिन्याला जेष्ठ नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाते.
 • तसेच योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना एक लाख 50 हजार पर्यंतचे रक्कम कर कपातीसाठी क्लेम करता येते.
 • सीनियर सिटीजन सेविंग स्कीमला प्रधानमंत्री वय वंदना योजनेपेक्षा उत्कृष्ट मानले जाते.
 • कारण प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये फक्त 7.4% व्याजदर असून त्याचा कालावधी दहा वर्षांचा असतो.
 • येथे सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा कालावधी फक्त पाच वर्षाचा असतो जो पाहिजे असेल तर आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येतो.
 • तसेच प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये कुठल्याही टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळत नाही.
 • १/४/२०२३ पासून प्रधानमंत्री वय वंदना योजना
 • बंद होणार असल्याचे समजते.
 • ज्यामुळे यात नवीन खाते उघडून आता गुंतवणूक करता येणार नाही.
 • परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांनी यापूर्वी गुंतवणूक केली असेल त्यांना त्यांचे खाते मॅच्युअर होईपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.

३ सोने खरेदी संदर्भात

 • सरकारने स्पष्ट केले आहे की कोणताही सोन्याचा दागिना सहा अंकी हॉलमार्क युनिक कोड शिवाय विकता येणार नाही.
 • हा हॉलमार्क युनिक कोड म्हणजे तुम्ही घेतलेला दागिना खऱ्या सोन्याचा असल्याची खात्री देतो.
 • त्यामुळे सोने खरेदी करताना त्यावर एच यु आय डी आहे किंवा नाही ते आवश्यक तपासा.
 • आतापर्यंत एच यु आय डी फक्त चार आकडे असायचा.
 • परंतु १/४/२०२३ पासून सहा आकडे एच यु आय डी कोड असलेले सोनेच विकलेत जाऊ शकते.
 • तुमच्याकडचे सोने खरे आणि प्रमाणित आहे किंवा नाही याची माहिती तुम्हाला बी आय एस ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड च्या अधिकृत वेबसाईटवर अथवा त्यांचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून मिळू शकते.
 • या वेबसाईटवर किंवा ॲप वर फक्त तुमच्याजवळ सोन्याच्या दागिन्याचा एच यु आय डी एंटर करायचा आहे.

४ इन्कम टॅक्स संदर्भात

 • १/४/२०२३ पासून नवीन टॅक्स रेझिम लागू करण्यात आले आहेत.
 • जुने टॅक्स रेझिम देखील चालूच राहणार आहेत पण नवीन टॅक्स रिजनमध्ये सरकारमार्फत अनेक चांगले बदल करण्यात आलेले आहेत.
 • ज्यानुसार तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न आता टॅक्स फ्री असणार आहे.
 • तसेच जर तुमचे कर पात्र उत्पन्न सात लाखांपर्यंत असेल तर नवीन टॅक्स रेझिम नुसार तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.

इन्कम टॅक्स संधारभात अजून माहितीसाठी येथे क्लिक करा

५ पेन्शन काढण्यासंदर्भात
 • Financial Year Update 2023 पेन्शन फंड रेगुल्लेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे पी एफ आर डी ए द्वारे पेन्शन काढतांना लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत.
 • हे नियम सुद्धा १/४/२०२३ पासून झाले आहेत.
 • नवीन नियमानुसार पेन्शन काढताना काही कागदपत्रे जमा करणे अनिवार्य असते जसे पीएफ विड्रॉल फॉर्म, ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा बँकेतील खात्याचा तपशील पुरावा आणि परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर म्हणजेच प्राईम कार्ड ची कॉपी या कागदपत्रांशिवाय तुम्हाला तुमचे पेन्शन काढता येणार नाही.
६ Financial Year Update 2023 विमा खरेदीवर लागणारे टॅक्स
 • १/४/२०२३ नंतर जर तुम्ही एखादी विमा पॉलिसी खरेदी करणार असाल त्यामध्ये वार्षिक प्रीमियम पाच लाख किंवा त्याहून अधिक असेल तर त्या विम्याद्वारे मिळणाऱ्या रकमेवरही तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे.
 • परंतु ३१/३/२०२३ पूर्वी खरेदी केलेल्या अशा विमा पॉलिसींवर हा नियम लागू होणार नाही.
 • आता सरकारच्या दृष्टिकोनातून जी व्यक्ती वर्षाला पाच लाख रुपये फक्त प्रीमियम साठी देऊ शकते ती व्यक्ती हाय नेटवर्क कॅटेगरीतील असू शकते.
 • म्हणूनच बहुतेक असा नियम लागु करण्यात आला असावा त्यामुळे या नियमाचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर होणार नसल्याचे समजते.
 • त्याचप्रमाणे १/४/२०२३ पासून महिला सन्मान बचत पात्र योजना सुरू होणार आहे.ज्या मध्ये महिलांनी फिक्स डिपॉझिट पेक्षा अधिक व्याजदर मिळणार आहे.

Ch Sambhaji nagar पंचायत समितीवर सरपंचाने २लाख उधळले

AAI Job Recruitment 2023 70000 रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे त्वरित अर्ज करा परीक्षा न देता मिळेल नोकरी

3 thoughts on “Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू”

 1. Pingback: Pik Nuksan Bharpai :२८२२ कोटी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई - Atharvarohi

 2. Pingback: New Small Saving Scheme :ही योजना देईल महिलांना 7.5% व्याज - Atharvarohi

 3. Pingback: Gopinath Munde Shetkri Vima :शेतात घाम गाळणाऱ्या हातांनाही सुरक्षेचे कवच - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!