Bombay High Court Recruitement ७ वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

Bombay High Court Recruitement उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी, २ वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-

 • तो / ती करार करणेस सक्षम असावा / असावी.
 • त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला / तिला कोणत्याही न्यायालय / एम. पी. एस. सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
 • त्याला / तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी नसावा. खटला प्रलंबित
 • महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास, २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

अर्ज करण्याची पध्दत :-

 • अर्ज सादर करतांना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा.
 • ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धिच्या दिनांकापासून १५ दिवसात करावा.
 • प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
 • पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक २४/०३/२०२३ ते दिनांक ०७/०४/२०२३ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
 • ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक २४/०३/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि दिनांक ०७/०४/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल.
 • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतः:चा अद्यावत पासपोर्ट साईज चा फोटो व स्वत:ची स्वाक्षरी स्कॅन करुन ४० KB पेक्षा कमी आकाराच्या दोन स्वतंत्र फाईल्स format मध्ये करुन ऑनलाईन अर्जात दर्शविलेल्या ठिकाणी सदर फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Bombay High Court Recruitement

 • उमेदवाराने https://bombayhighcourt.nic.in
 • या वेबसाईट वर क्लिक करुन Recruitment मध्ये ‘Peon / Hamal’ च्या Apply Online वर क्लिक करावे
 • तद्नंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी तद्नंतर SBI Collect Reference No. प्राप्त होईल तद्नंतर ऑनलाईन फॉर्म भरावा.
 • उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वांत शेवटी I Agree बटणावर क्लिक करुन अर्ज सादर (Submit) करावा.
 • (एकदा माहिती सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
 • तसेच त्यासंदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाकडून कोणतीही तकार / दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही).
 • उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा.
 • संपूर्ण भरलेला अर्ज सादर (Submit) केल्यानंतर उमेदवाराने Print Application मध्ये जाऊन Registration ID No टाकून Print काढून
 • त्या Printout वर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरतांना Upload केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळया पेनाने स्वाक्षरी करावी.
 • अर्जाचे Printout स्वत:कडे जतन करून ठेवावे. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये.
 • मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्या-त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी.
 • ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमुद शैक्षणिक पात्रता व इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्विकारला जाईल.
 • परीक्षेच्यावेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणि पडताळणीसाठी स्वतःचे आधारकार्ड / पॅनकार्ड / वाहन परवाना इ. ओळखपत्र आणणे सक्तीचे आहे.
 • त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
 • उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांकरीता सूचना :-

 • अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करतांना शुल्क १२५/- भरणेआवश्यक आहे आणि ते शुल्क परत मिळणार नाही.
 • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 • उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यासत्याच्या/तिच्याकरण्यात येईल.
 • अल्प सूचीची यादी ( Shortlisting) उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर (https://bombayhighcourt.nic.in) प्रकाशित झाल्यानंतर ज्या अर्जदारांचे नाव अल्प सुची मध्ये आहे त्यांनी शुल्क ११२५/- भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क परत केले जाणार नाही.
Bombay High Court Recruitement ऑनलाईन शुल्क भरण्याची पध्दत:-
 • Bombay High Court Recruitement उमेदवाराला नोंदणी शुल्क ₹२५/- ‘SBI Collect ‘ द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांना ‘SBI Collect सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी ‘User Mannual’ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.
 • अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाईल.
 • ‘SBI Collect’ सुविधेद्वारे तयार केलेले नियम, अटी व शर्तीची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाची नाही.
 • ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.
 • या बाबत कोणत्याही स्वरूपाची चौकशी / दाव्याची दखल घेतली जाणार नाही.

income tax return:इन्कम टॅक्स भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

Maha Vitaran मे पासून वीजबिल वाढणार! तब्बल ३७टक्के ने होणार वाढ

1 thought on “Bombay High Court Recruitement ७ वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर”

 1. Pingback: Ration Card Rules : रद्द होईल तुमचे रेशन कार्ड ! - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!