Pan-Aadhaar Linking : आधार-पॅन लिंक बाबत मोठी अपडेट!

Pan-Aadhaar Linking : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण त्यापूर्वीच मोठी बातमी हाती येत आहे.

  • केंद्र सरकारने काँग्रेसची विनंती मनावर घेतली तर होऊ शकतो मोठा बदल.
  • पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीत जव लागते अडचणींना सामोरे .
  • केंद्र सरकारने त्यासाठी मोठी मुदत वाढ दिली होती. त्यानंतर विलंब शुल्क आकारुन पण मुदत वाढ देण्यात आली.
  • तरीही काही नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अद्याप जोडलेले नाहीत.
  • त्यांना तांत्रिक अडचणी आणि इतर समस्यांचा सामना करावा लागल्याने हा घोळ झाला आहे.
  • पण याविषयी केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास बदल होण्याची शक्यता आहे.
  • आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 ही निश्चित आहे.
  • गेल्या वर्षीच केंद्र सरकारने याविषयीची घोषणा केली होती. जोडणीसाठी नागरिकांना वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली होती.
  • त्यानंतर नागरिकांना सशुल्क मुदत वाढ देण्यात आली आहे. पूर्वी 500 रुपये आणि नंतर 1000 रुपयांच्या दंडासह ही मुदत वाढ देण्यात आली.
  • आता 31 मार्च नंतर मात्र पॅन कार्ड रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यामुळे अनेकांचा धाबे दणाणले आहे.

Subsidies : आजच करा आपल्या शेताला सौर ऊर्जा कुंपान योजना

काँग्रेसचे पंतप्रधानांना पत्र

  • दरम्यान काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
  • त्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांचे लिकिंग करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. पुढील 6 महिन्यांकरीता ही मुदत वाढ देण्याची विनंती त्यांनी केली आहे.
  • एवढेच नाही तर , आता ही संपूर्ण प्रक्रिया निःशुल्क करण्याची विनंतीही चौधरी यांनी मोदी यांना केली आहे.
  • त्यामुळे देशातील असंघटीत कामगार तसेच इतर लोकांना फायदा होईल. त्यांना आर्थिक भूर्दंडातून सूट देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

(MJPJAY) : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

Pan-Aadhaar Linking : चौधरी यांना वाचला असुविधांचा पाढा

  • खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, अर्थमंत्रालयाच्या महसूली विभागाने आधार कार्ड-पॅन कार्ड ऑनलाईन जोडणीसंबंधी अधिसूचना काढली आहे.
  • त्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2023 ही निश्चित आहे. ही नोंदणी सध्या एक हजार रुपये घेऊन करण्यात येत आहे.
  • पण देशातील दुर्गम, डोंगरी भागातील नागरिकांना अद्यापही यासाठी वेळ मिळालेला नाही. त्यांच्याकडे वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे.
  • एक हजारांचा दंड, मध्यस्थ, दलाल यांच्यामुळे ते लिंकिंगसाठी धजावत नसल्याची कैफियत मांडण्यात आली आहे.
  • ही अत्यंत क्लेषदायक परिस्थिती आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी या कशाचाही विचार न करता प्रचंड दंड आकारण्यास सुरुवात केल्याने देशातील मोठ्या वर्गाला आर्थिक लाभांपासून, आर्थिक सुविधांपासून वंचित करता येणार नाही.
  • त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांकडे मुदत वाढ देण्याची विनंती केली आहे. तसेच ही जोडणी पूर्णतः निशुल्क करण्याचा आग्रह धरला आहे.Pan-Aadhaar Linking :

Pvc Pipe Anudan पाईप लाईन योजना ऑनलाईन अर्ज सुरू.

Farmers Protest : शेतकरी एकवटणार; केंद्र सरकारला टेन्शन, मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम

3 thoughts on “Pan-Aadhaar Linking : आधार-पॅन लिंक बाबत मोठी अपडेट!”

  1. Pingback: Post Office Suraksha Yojana : ७०५ रू. महिना भरा आणि २०५८००० रू. मिळवा. - Indien Farmer

  2. Pingback: Post Office Suraksha Yojana : ७०५ रू. महिना भरा आणि मिळवा २० लाख ५८ हजार रू. - Atharvarohi

  3. Pingback: Financial Year Update 2023 देशात 1 एप्रिल पासून सहा मोठे नियम लागू - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!