Bij Bhandaval Anudan 50% अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो. जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती. तुम्हाला जर उद्योग व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे भाग भांडवल नसेल तर तुम्ही 50% अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते जाणून घेऊयात 50 टक्के अनुदान योजना संदर्भात सविस्तर माहिती.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
- अनेक तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते.
- अशावेळी त्यांना आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने असे तरुण त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.
- तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सुरू असतात परंतु अशा योजनांची माहिती तो अशा योजनांची माहिती न मिळाल्याने अनेक तरुण अशा योजना पासून वंचित राहण्याची शक्यता असते.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणारी अशीच एक योजना म्हणजे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ रावीत असलेल्या 50% अनुदान योजना व बीज भांडवल योजना.
- जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रस्ताव स्वीकारणे सुरू झालेले आहे.
Bij Bhandaval Anudan युवकांसाठी सुवर्ण संधी
- 2023 24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत 50 टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन योजना राबविल्या जात आहेत.
- दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात.
पात्रता
- Bij Bhandaval Anudan योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवोदय अर्जदार घेऊ शकतात.
- जे अर्जदार या कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करणार आहे त्यांनी या महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- जर यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर असे लाभार्थी या कर्ज योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
कर्ज योजनेच्या काही ठळक बाबी
- अर्जदार हा 18 वर्षावरील असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असावे.
- 50 टक्के अनुदान योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत असणे गरजेचे आहे.
- जो प्रकल्प असेल त्या प्रकल्प मर्यादाच्या 50% किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.
- बीज भांडवल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार ते पाच लाखापर्यंत असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने अर्ज केलेल्या प्रकल्प मर्यादेच्या 20% वीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत देण्यात येते.
- यासाठी व्याज आकारले जाते हे व्याज चार टक्के दर साल दर शेकडा याप्रमाणे आकारण्यात येते.
- महामंडळाच्या 20% बीज भांडवल कर्जानंतर बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो.
- महामंडळाचे 20 टक्के व बँकेच्या 75 टक्के कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हत्यानुसार करावी लागते.
- अर्जदारास कर्जाचे परतफेड तीन ते पाच वर्षाच्या आत करावी लागते.
- कर्ज योजनेसाठी अर्जदारास पाच टक्के स्वतःचा सहभाग भरणे गरजेचे असते.
- जर पात्र अर्जदार असाल तर या योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करून द्या.
Bij Bhandaval Anudan कर्ज प्रस्ताव कोठे करायचं सादर
- कर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन कलानगर मुंबई उपनगर वांद्रे पूर्व मुंबई ५१ या ठिकाणी त्यांचे कर्ज प्रस्ताव सादर करून द्यावेत.
- योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित या वेबसाईटला भेट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी
- राज्य योजना वर टॅब क्लिक केल्यानंतर राज्य योजना अनुदान योजना या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजना संदर्भात अधिक ची माहिती जाणून घेऊ शकता.
कागदपत्रे
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी पुरावा
- (ह्यामध्ये रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, इत्यादी)
- व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे (जसे की मालाचे किमती पत्रक, आवश्यक असल्यास जागेचा पुरवा, गुमास्ता लायसन्स, व्यवसाय निरोप, परमिट, बस नंबर, इत्यादी)
- आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल
- (जर दोन लाखाच्या वर असेल तर)
- जमीनदाराचे वेतन कपात हमीपत्र
- वेतन प्रमाणपत्र
- मालमत्ता धारक जमीनदार असल्यास संपत्तीची नोंद असलेले दस्तऐवज
- जमीनदार पडताळणी अहवाल
- जमीनदाराचे इलेक्शन कार्ड
- विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र
- कर्ज वसुलीचे अनुषंगाने अर्जदाराचे उत्तर दिनांक इत्यादी पूर्तता करून घेतली जाते.
- Bij Bhandaval Anudan अशा मंजूर कर्ज प्रकरणात कर्ज वितरणापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची किंवा जामीनदारांची इत्यादी पूर्व झाल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज प्रस्ताव वितरणाच्या मंजुरी करता प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे सादर केले जाते.
- प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून कर्ज वितरण्याकरता मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत कर्ज वितरणाचे अनुषंगाने संबंधित राष्ट्रीयकृत बँकेच्या नावे बीज भांडवल म्हणजेच कर्ज व अनुदान अशा दोन रकमांचे दोन स्वतंत्र धनादेश काढण्यात येऊन बँकेकडे पाठवले जातात.
Jerenium Farming :शेतकऱ्याला करोडपती करणारी शेती
Bhu Kharedi Yojana :जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज
Pingback: Malani Yantra Anudan :मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान - Indien Farmer
Pingback: Ativrushti Nuksan bharpai :गेल्या वर्षीच दुष्काळ अनुदान मिळाला का? नसेल मिळाला तर पाहा कसा करायचं अर्ज - Indien Farmer