Soybean Market update देशातील सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढण्याची शक्यता आहे . कारण चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार राहिला आहे.पण सोयापेंडच्या दरात (Soyacake Rate) वाढ झाली होती. तर देशातील बाजारातही दरात काहीशी सुधारणा झाली. पुढील आठवड्यातही देशातील बाजारात सोयापेंडचे दर वाढू शकतो.आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात जवळपास सर्वच शेतीमालाच्या दरात तेजी मंदी पाहायला मिळाली. सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार होते.
मंगळवारी म्हणजेच ३ जानेवारीला सोयाबीनचा बाजार (Soybean Market) १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर खुला झाला होता. रुपयात हा दर ४ हजार ६२६ रुपये प्रतिक्विंटल होतो. त्यानंतर दरात मोठी घट झाली.गुरुवारी सोयाबीनने आठवड्यातील निच्चांकी १४.७० डाॅलरचा टप्पा गाठला. रुपयात सांगायचं झालं तर हा ४ हजार ४७४ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर कमी झाला.तर शुक्रवारी दरानं काहीशी उभारी घेत बाजार १४.९२ डाॅलरवर म्हणजेच ४ हजार ५३५ रुपयांवर बंद झाला. मंगळवारच्या दराशी तुलना करता शुक्रवारी सोयाबी ९१ रुपयाने कमी झाले होते.मंगळवारी ६५ सेंट प्रतिपाऊंडवर असणारे सोयातेलाचे दर शुक्रवारी ६३.३६ सेंटवर होते.
Soybean Market update सोयापेंड मध्ये तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे नरमले, मात्र सोयापेंडच्या दरात वाढ झाली. मंगळवारी सोयापेंडचे वायदे ४६५ डाॅलर प्रतिटनावर खुले झाले होते.रुपयात हा दर ३८ हजार २५५ रुपये होतो. त्यानंतर मात्र दरात चढ उतार आले. गुरुवारी दर ४६० डाॅलरवर घसरल्यानंतर पुन्हा वाढले.शुक्रवारी आठवड्याचा बाजार बंद झाला तेव्हा दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला. शुक्रवारी बाजार ४७७ डाॅलरवर बंद झाला.म्हणजेच ३९ हजार २४२ रुपयांवर सोयापेंडचे वायदे बंद झाले. मागील आठवडाभरात सोयापेंडच्या दरात टनामागं जवळपास एक हजार रुपयांची सुधारणा झाली होती.
💥द्राक्ष उत्पादकानसाठी चागळी बातमी💥
Soybean Market update देशातही दरपातळीत वाढ झालेली दिसून आली
चालू आठवड्यात देशातील सोयाबीन दरातही क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांपर्यंत तेजी मंदी दिसून आली.सोमवारी देशातील सोयाबीनची भावपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये होती. त्यात काहीसे चढ उतार होत बुधवारी दर ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांवर पोचले होते.
Pingback: Cotton market rate : कापूस दरात वाढ जाणून घ्या आजचे ताजे भाव - Indien Farmer