Grape Rate today औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे सौदे देणे जवळपास आठवडाभरापासून सुरू झाले आहे. जाणून घ्या बाजारामध्ये सध्या काय चालू आहे .
Grape Rate today जालना जिल्ह्यात उत्पादन जास्त
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे (Grape Orchard) सौदे देणे जवळपास आठवडाभरापासून सुरू झाले आहे. कडवंची शिवारातील काळ्या द्राक्षांचा १२१ रुपये प्रति किलो, (Black Grape Rate) तर इतर द्राक्षांना ५० ते ७० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सौदी झालेल्या काही बागांत काढणी (Grape Harvesting) सुरू झाली आहे.जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील सटाना, पळशी परिसरांतही द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे.
👉आजचा सोयाबीन आणि कापसाचा भाव जाणून घ्या👈
Grape Rate today पावसामुळे झाले उत्पादन कमी
यंदा अति पावसाने बांगांचा घात केला. लांबलेल्या छाटण्याचाही परिणाम उत्पादन व बागा फुटण्यावर झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ३० ते ४० टक्के बागा फुटल्याच नाही. दुसरीकडे लवकर छाटण्या केलेल्या व आता काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांमध्ये उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे माहिती आहे .कोरोनाच्या संकटात दोन हंगाम गेल्याने द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. काही अंशी वातावरण पोषक असले, तरी यंदा कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या. पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या २५ टक्के, ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ६० टक्के, तर त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जवळपास ३० टक्के झाल्या.
टप्पेनिहाय झालेल्या छाटणीत जवळपास २० ते ३० टक्के बागा फुटल्याच नाही. केवळ ३० ते ४० टक्के बागा बऱ्यापैकी फुटल्या, तर उर्वरित बांगाची फूट ही जेमतेम राहिली. डाऊनी भुरी घडकजु आदी आक्रमण द्राक्ष बागांवर झाले.गेल्या हंगामात द्राक्षात अपेक्षित गोडी नव्हती. कदाचित घडांची व त्यामध्ये मन्यांची संख्या जास्त यामुळे ती गोडी नसावी म्हणून यंदा शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या अपेक्षित गळ न झाल्याने कृत्रिमरीत्या गळ होण्यासाठी प्रयत्न केले.त्यासाठी थिनिंगही केली, त्यामुळे गोडी चांगली येण्याची आशा आहे . मोठ्या प्रमाणात २६ जानेवारी नंतरच द्राक्ष बाजारात येण्याची अपेक्षा आहे, असे असले तरी अनेक बागांमध्ये उत्पादनात मोठी घट दर बरे असली, तरी द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढवणारी आहे.एक एकरावर काळे द्राक्ष बाग घेतली. नुकत्याच दिलेल्या सौद्यात त्याला व्यापाऱ्याकडून १२१ रुपये प्रति किलोचा दर देण्यात आला. तीन टप्प्यांत व्यापारी द्राक्षांची तोडणी करणार आहे.
Pingback: Grapes Farming कडवंचीच्या काळ्या द्राक्षाला प्रति किलो 121 रुपयांचा दर, अन्य वाणाच्या द्राक्षांना 50 ते 70 रु
Pingback: Cotton market today : कापसाच्या बाजार भाव मध्ये उतारचढाव जाणून घ्या काय आहे कापसाचा बाजार भाव - Indien Farmer