Ration Card SRC Number: ऑनलाईन रेशन कार्ड चा SRC नंबर काढण्याचे संपूर्ण अपडेट

Ration Card SRC Number हा एका अतिशय महत्वाचा नंबर आहे. बर्‍याच सरकारी कामांमध्ये आपल्याला या नंबर ची आवश्यकता असते.

रेशन कार्डचा SRC Number आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. ज्याच्यामध्ये मेरा रेशन ऍप (Mera Ration App) असेल किंवा आरसीएमएस चा पोर्टल (RCMS Portal) असेल किंवा आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन (National Food Security) च्या या पोर्टलवरून आपण हा SRC Number काढू शकतो.

👉येथे क्लिक करा.👈

एनएफएसच्या पोर्टल वरुण SRC Number काढणे

मित्रांनो याच्यासाठी आपल्याला एनएफएससीच्या पोर्टल वरती जायचे आहे. नॅशनल फूड सिक्युरिटीच्या पोर्टल वर आल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन दाखवले जातात. ज्याच्यामध्ये वरती मेन ऑप्शन मध्ये रेशन कार्ड नावाचे ऑप्शन दाखवले जाते. रेशन कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातात.

ज्याच्यामधील दुसरा ऑप्शन आहे, रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल या स्टेट पोर्टलच्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक ऑप्शन ओपन होईल. ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडण्यासाठी ऑप्शन येईल. यामध्ये आपल्याला महाराष्ट्र वरती क्लिक करायचे आहे.

👉SRC नंबर काढण्यासाठी येथे क्लिक करा.👈

महाराष्ट्र वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपल्या जिल्ह्यानुसार सुद्धा आपण जिल्हा सिलेक्ट करू शकतात. आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे काही ऑप्शन येतील. याच्यामध्ये आता आपण वर्धा जिल्हा सिलेक्ट केलेले त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करायचे आहे. जिल्ह्यामधील प्रकारानुसार त्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारचे रेशन कार्ड पाहिजे त्या प्रकारानुसार पाहू शकतात. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या साईडला क्लिक करायचे आहे. साईडला क्लिक केल्यानंतर खाली कुठले ही ऑप्शन सिलेक्ट करायची नाही.

Ration Card SRC Number

नंतर व्ह्यू रिपोर्ट नावाचे ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता. त्या जिल्ह्याचा पुरवठा अधिकाऱ्याची माहिती तसेच त्या जिल्ह्यामध्ये मिनिमम एक आधार कार्ड लिंक केलेले किती रेशन कार्ड येतात. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर रेशन कार्ड ला आधार लिंक केलेली किती रेशन कार्ड किंवा किती व्यक्ती याच्याबद्दल चे सर्व माहिती दाखवली जाते.

👉ऑनलाईन SRC Number काढा.👈

याच्यामधून आपल्याला तालुका निहाय पाहण्यासाठी नावावरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर सर्व तालुक्याचे तहसील निहाय त्या ठिकाणी माहिती दाखवली जाईल. तुमचा गाव ज्या तालुक्यांमध्ये असेल, त्या तहसीलच्या नावावरती क्लिक करायचे. तसेच या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व रेशन दुकानाचे नाव दाखवले जातील. जे जे पीडीएफ वरती आहेत असे सर्व दाखवले जातील. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या गावाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी जोडली जाणार आहे.

याच्यानंतर आपण पाहू शकता सर्वात प्रथम जो दिलेला आहे तो आपला बारा अंकी एसआरसी नंबर (Ration Card SRC Number) आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्याचं नाव त्याची पूर्ण माहिती त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव मोबाईल नंबर आधार लिंक वगैरे वगैरे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!