Onion Plant : बुरशीमुळे महागाचे बियाणे जमिनीतच

देवळा : मागील महिन्यातील सततच्या पावसा मुळे उन्हाळी कांद्यासाठी (Summer Onion) टाकलेल्या कांदा बियाणाच्या (Onion Seed) उगवण क्षमतेवर चांगलाच परिणाम झाला आहे. अनेक शेतातील कांदा रोपे (Onion Plant) मरू लागल्याने ‘महागाचे बियाणे जमिनीतच’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वाचा सविस्तर माहिती……

👉येथे क्लिक करा.👈

येथील कसमादे भागात रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी लाल कांदा कमी असल्या मुळे उन्हाळ कांदा चांगले पैसे देऊन जाईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाण्याची पेरणी करीत रोप तयार करत असतात.

👉आजचे कांदा बाजारभाव पहा. 👈

यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी शेत मोकळे ठेवत बियाण्याची पेरणी केली आहे. मात्र, मध्यंतरी सततच्या पावसाने जमिनीत बुरशी निर्माण झाली आहे. यामुळे कांदा रोपाच्या मुळ्या कमकुवत होऊन रोपे मरू लागली आहे. यामुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. कांदा रोप (Onion Plant) तयार करतेवेळी प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते.

👉पहा आजचे कांदा बाजारभाव👈

एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे रोप इतके महाग! त्यात रोप खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था अवघड झाली आहे. शासनाने कांद्याची भाववाढ करून दिलासा द्यावा.

3 thoughts on “Onion Plant : बुरशीमुळे महागाचे बियाणे जमिनीतच”

  1. Pingback: Orange Farming: शेतात सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यास राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार - Indien Farmer

  2. Pingback: Kanda Chal Anudan : पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पध्दत, पहा नविन अपडेट... - Krushi Vasant

  3. Pingback: Pyaj Bhandaran Yojana 'उन' किसानों को 1 लाख 60 हजार - Agrosolution

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!