Orange Farming: शेतात सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यास राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल, नरखेड, तर अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदुर बाजार हा पट्टा म्हणजे संत्र्यासाठी कॅलिफोर्निया चा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशातून सर्व भारतात आणि विदेशात देखील संत्रा पाठविण्यात येतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये संत्रा या पिकावरील अनेक रोग पाण्याचा अभाव, नवतरुण शेतकऱ्यांची उदासीनता यामुळे संत्रा उत्पादनासाठी (Orange Farming) ओळखला जाणारा हा प्रदेश आता नामशेष होतो की काय अशी भीतीच वाटू लागली होती. पण काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कठीण परिश्रम करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संत्र्याला नवसंजीवनी मिळवून दिली आहे आणि हा प्रदेश संत्र्यासाठी अबाधित ठेवला आहे. यामधीलच एक ताकदीचं नाव म्हणजे शेतकरी पुत्र विपुल चौधरी.

👉येथे क्लिक करा👈

विपुल चौधरी यांची खासियत म्हणजे त्यांनी संत्रा उत्पादनाचा (Orange Farming) उच्चांक गाठला असताना, यासंबंधीचे हे ज्ञान त्यांनी स्वतः पुरतेच मर्यादित ठेवले नाही तर त्यांचा या ज्ञानाचा फायदा त्यांनी इतर लोकांना देखील करून दिला संत्रा उत्पादनात आपल्याप्रमाणेच आपल्या परिसरातील आणि इतर भागातील शेतकरी देखील हुशार व्हावा आणि त्याला भरपूर लाभ व्हावा ही त्यांच्या मनाची आकाश उंची खूपच आदर्श आहे. आपल्या प्रमाणे हा समाज प्रगत व्हावा आणि त्याला भरपूर लाभ व्हावा मोलाची भावना खरंच खूप स्तुतीपूर्वक आहे.

👉संत्रा उत्पादन कसे करावे ते पहा.👈

चांदूर बाजार तालुक्यामधील गोधळ हे विपुल चौधरी यांचा गाव. कृषी पदवित्तर संत्रा उत्पादक (Orange Farming) शेतकरी आणि कृषी मार्गदर्शक म्हणून त्यांचा या भागात मोठा नावलौकिक आहे. या भागातील संत्रा शेती मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि याचे पतील म्हणजे विपुल चौधरी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराने यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथे सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे शेतकरी आणि शेती क्षेत्रात निगडित काम करणाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे असा आहे. राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार हा वैज्ञानिक क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी गेल्या 16 वर्षांपासून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते यशवंतराव प्रतिष्ठान तर्फे यावेळी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार सोहळा पार पडला.

👉संत्रा उत्पादन: सविस्तर माहिती👈

फुल चौधरी हे युवा संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून प्रख्यात आहेत. त्यांचं मार्गदर्शन घ्यायला अनेक शेतकरी दूरवरून येतात. आणि विपुल हे सर्वांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवाचा इतरांना खूप फायदा होतो. सद्यस्थितीमध्ये विपुल यांच्या संपर्कात राहून 300 शेतकरी संत्रा शेती करीत आहेत. विपुल यांच्या कृषी कार्याची दखल राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कांबळे आणि त्यांच्या निवड समितीने घेतली. आणि त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.

👉संत्रा उत्पादन: सविस्तर माहिती👈

विपुल चौधरी यांच्यासारख्या शेतकरी तज्ञांची आज समाजाला घरी गरज आहे. विपुल चौधरी यांच्या कार्याला अनेक लोकांच्या शुभेच्छा जरी असल्या तरी काळ्या आईचा त्यांना आशीर्वाद आहे असेच म्हणावे लागेल.

2 thoughts on “Orange Farming: शेतात सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यास राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार”

  1. Pingback: Mulching Paper Yojana : मल्चिंग पेपर योजना, असा करा अर्ज... - Krushi Vasant

  2. Pingback: Gopinath Munde Shetkari Vima Yojana सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मिळते मदत - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!