Mahavitaran MSEB : लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपींचे 5000 बळी

नांदेड वीज वाहिनी च्या तारा, वाकलेले विद्युत पोल, डीपी अशा ठिकाणी शॉक लागून गेल्या दहा वर्षात राज्यभरात तब्बल पाच हजार 466 माणसांचा आणि 8064 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य महावितरण (Mahavitaran MSEB) कंपनीचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत ठरला आहे.

Mahavitaran MSEB : लोंबकळणाऱ्या तारा, उघड्या डीपींचे 5000 बळी

माहिती अधिकारात उघड

महावितरणच्या उपकरणांचा शॉक लागून राज्यात 2012 ते 2022 या दहा वर्षात किती मृत्यू झाले आहेत. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या मुंबई मुख्यालयाला मागितली गेली आहे. 4 नोव्हेंबर रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्याला ही माहिती प्राप्त झाली आहे. त्यात ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.

👉येथे क्लिक करा.👈

Mahavitaran MSEB कडुन नुकसान भरपाई देखील दुरापास्त

इतर प्रकरणात भरपाई असली तरी महावितरणाच्या उपकरणाचा शॉक लागून मृत्यू झाल्यास सहसा कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.

पाळीव आणि शेतकऱ्यांच्या मालकीची जनावरे

महावितरणाच्या या कारभारामुळे गेल्या दहा वर्षात राज्यातील आठ हजार चौसष्ट जनावरांचा बळी गेला आहे त्यातील बहुतांश जनावरे ही पाळीव आणि शेतकऱ्यांच्या मालकीची आहेतआधीच कर्ज आणि नापिकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधन मरण पावल्याने आणखी धक्का सहन करावा लागला आहे त्यांचे नुकसान झाले मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही.

👉👉महावितरण भरती.👈👈

काय आहेत कारणे

पाऊस आणि वादळात विजेचे वहन करणाऱ्या तारा तुटून पडणे.

खाली आलेल्या तारांना रस्त्यावरून येणाऱ्या जनावरांचा स्पर्श होणे.

विद्युत पोल मध्ये करंट असणे.

विद्युत डीपी सताड उघड्या असणे.

महावितरणाचे अभियंते, लाईनमन व इतर संबंधित यंत्रणा यांचे दुर्लक्ष.

👉येथे क्लिक करा.👈

महावितरण आणखी किती बळी घेणार?

एवढ्या मोठ्या संख्येने मनुष्य आणि प्राणहानी झाल्यानंतर देखील महावितरणाचा कारभार मात्र सुधारलेला नाही.

आजही ग्रामीण भागातच नव्हे तर शहरात देखील अनेक वस्त्यांमध्ये महावितरणच्या डीपी उघड्या आणि धोकादायक अवस्थेत आहेत.

अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत आहेत वारंवार तक्रारी करून देखील त्यात सुधारणा होत नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!