Maharashtra budget : ॥ तुका म्हणे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी || घोषणांचा अवकाळी पाऊस, पण तुटीचे चटके

Maharashtra budget : सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तरतूद केलेला निधी खर्च केला नाही तर पुढच्या वेळी निधी दिला जाणार नाही. हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प नाही. विधानसभेच्या निवडणुका आम्ही वेळेवरच घेऊ आणि जिंकू. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. नरेंद्र मोदी सरकारचे ५ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्यकरण्यासाठी महाराष्ट्र सहकार्य करेल. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

फसवणीसांचे फसवामृत!

यांना हे देऊ, त्यांना ते देऊ… देणार कुठून त्याचा पत्ता नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प आज विधान सभेत मांडला. ‘पिकवावे धन।ज्याची आस करी जन।’ अशा संत तुकोबारायांच्या अभंगाने सुरुवात करत फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात घोषणांचा अवकाळी पाऊस पाडला. मात्र १६ हजार १२२ कोटी रुपये महसुली तुटीचे चटकेही या अर्थसंकल्पामुळे राज्याला बसले आहेत. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी… महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास… भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास…. रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा… पर्यावरणपूरक विकास अशा पंचामृत ध्येयावर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अवकाळी वरून विधिमंडळात कडकडाट

मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे ‘मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी।।’ या तुकोबारायांच्याच अभंगासारखा असल्याची टीका होत आहे. तहानलेले हरीण ऊर फोडून मृगजळामागे धावत असते; परंतु ते पाणी नसून निव्वळ एक भास आहे असे तिला नंतर कळते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात मिंधे सरकारकडून छातीठोकपणे आणि बाके बडवून केलेल्या अनेक घोषणा या महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच असल्याने हे फसवणीसांचे फसवामृत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

पशुपालकांना दुग्ध व्यवसायासाठी SBI देणार कर्ज

Maharashtra budget : हेच ते पंचामृत

  • १. शाश्वत शेतकरी, समृद्ध शेतकरी
  • ■ नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत १२ हजार सन्माननिधी
  • ■शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा
  • ■ २०० कोटींच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
  • २. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • ■मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना. १८ व्या वर्षी ७५ हजार मिळणार
  • ३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • ■ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार; मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
  • ४. रोजगार निर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • ■स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
  • ■ नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, हिऱ्यांच्या उद्योगाला चालना

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक’

कांदा समितीच्या २० वर्षांपूर्वीच्या शिफारशींचे झाले तरी काय?

1 thought on “Maharashtra budget : ॥ तुका म्हणे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी || घोषणांचा अवकाळी पाऊस, पण तुटीचे चटके”

  1. Pingback: Nashik Onion price : ध्यानात ठेवा कांदा! लक्षात ठेवा कांदा! चांदवड मध्ये रस्ता रोको. कांदे रस्त्यावर ! - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!