Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक’

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन शहरात होताना पाहायला मिळत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज औरंगाबाद शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्यात आलं आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान आज (10 मार्च) शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे ही बंदची हाक दिली गेली आहे.

Garpit Nuksaan 2023 : अवकाळी वरुन विधिमंडळात कडकडाट

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन शहरात होताना पाहायला मिळत आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज छत्रपति संभाजीनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आज (10 मार्च) रोजी शहर बंदची हाक देण्यात आली. तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलल्याच्या निषेधार्थ लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

शहरात निघाला कँडल मार्च

औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी शहरात कँडल मार्च काढण्यात आला. संध्याकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव औरंगाबादच ठेवावं या प्रमुख मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर पाहायला मिळाले. या कँडल मार्चचं नेतृत्व महिलांनी केलं. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते.

👉शहरात चिंताजनक वातावरण👈

Chhatrapati Sambhajinagar: साडेपाच हजार आक्षेप दाखल

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करु नये म्हणून, आत्तापर्यंत पाच हजार पाचशे जणांनी आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. साखळी उपोषण जिथे सुरु आहे तिथून आतापर्यंत 3 हजार 300 आक्षेप घेणारे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले. तर इतर लोकांनी मिळून आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 2300 नामकरण बाबतचे आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करु नये म्हणून 5500 जणांनी आक्षेप अर्ज दाखल केले आहेत.

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार

Maha scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

1 thought on “Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज ‘शहर बंदची हाक’”

  1. Pingback: Maharashtra budget : ॥ तुका म्हणे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे। खोटियाचे पिसे ऊर फोडी || घोषणांचा अवकाळी पाऊस, पण तुटी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!