Government Job Update : तुमचं शिक्षण ह्या फील्ड मध्ये झालंय का? मग थेट केंद्रीय मंत्रालयात नोकरीची संधी; करा अर्ज

Government Job Update : जल संसाधन मंत्रालय व नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयांचं एकत्रिकरण करून 2019 मध्ये जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. गेल्या काही दशकांपासून देशाला भेडसावत असलेल्या पाण्यासंबंधीच्या वाढत्या आव्हानांबाबत हे मंत्रालय कार्य करतं. संपूर्ण देशातील पाणी प्रश्नांबाबत आणि व्यवस्थापनाबाबत काम करण्यासाठी या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. जलशक्ती मंत्रालयानं, जलसंपदा विभागातील नदी विभागांतर्गत अप्पर यमुना रिव्हर बोर्डामध्ये (UYRB) सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदावरील नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत व जलशक्ती मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदाची एक जागा रिक्त आहे. या जागेवर प्रतिनियुक्ती मिळालेल्या व्यक्तीला वेतनश्रेणी स्तर 10 नुसार पगार दिला जाईल. ‘स्टडी कॅफे’ नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोस्टचं नाव आणि संख्या:

जलशक्ती मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी प्रतिनियुक्ती तत्त्वावर फक्त एक जागा रिक्त आहे.

Summer Tips :आला उन्हाळा मुलांना सांभाळा.

Government Job Update : वयोमर्यादा:

सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी इच्छुक व्यक्तीचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

नोकरीचं ठिकाण आणि कार्यकाळ:

या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीला दिल्ली येथील मंत्रालयाच्या मुख्यालयात काम करावं लागेल. प्रतिनियुक्तीचा कालावधी साधारणपणे तीन वर्षांपेक्षा जास्त नसेल.

Government Job Update : पे स्केल:

सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट ‘अ’) पदासाठी नियुक्ती झालेल्या व्यक्तीला वेतनश्रेणी स्तर 10 नुसार 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपये मासिक पगार मिळेल.

Heirship Certificate वारस हक्क लावण्यासाठी वारस दाखला आवश्यक

Government Job Update : पात्रता निकष:

A) केंद्र सरकार/राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील अधिकारी:

मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अ‍ॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-8 मधील दोन वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे.

PM Awas Yojana : तुम्ही पण तुमच्या स्वप्नातले घर बांधू शकता.

B) खालील शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असला पाहिजे:

I) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची बॅचलर पदवी मिळवलेली असलेली पाहिजे.

II) सिंचन आणि पाणी वापराच्या क्षेत्रात किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेमध्ये सिंचन प्रकल्पांचं सर्वेक्षण, अन्वेषण, डिझाइन, देखभाल किंवा कामाचा तीन वर्षांचा अनुभव असला पाहिजे.

निवड प्रक्रिया:

प्रतिनियुक्तीवर सहाय्यक कार्यकारी अभियंता पदासाठी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

Govt Employees Strike : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक आंदोलनकर्त्यांमध्ये वाद; संपावरुन दोन शिक्षक संघटना आमने-सामने

govt employees strike : सरकारी काम… संप आहे, थांब!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!