Farmers Protest : आश्वासन नको अंमलबजावणी हवी आणि ती घेतल्याशिवाय जाणार नाय!

शेतकरी ठाम; चर्चा निष्फळ… लाल वादळ मुंबईत धडकणार

Farmers Protest : नाशिक येथून विविध मागण्यांसाठी मुंबईकडे लाँग मार्चने निघालेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी राज्य सरकारने केलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली. आणि जोवर सरकार आश्वासनांची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे शेतकरी म्हणाले त्यामुळे लाल वादळ मुंबईवर धडकणार हे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत भारतीय किसान मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा हा ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे थांबवला. माजी आमदार जिवा पांडू गावीत यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज विधान भवनात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण यांनी तीन तासांहून अधिक वेळ सरकारशी विस्तृत चर्चा केली, तरीही चर्चेतून ठोस मार्ग निघाला नाही.

Farmers Protest : या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार जिवा पांडू गावीत यांनी ‘घेतल्याशिवाय जाणार नाय’ हा शेतकऱ्यांचा निर्धार बोलून दाखवला. दरवेळी शेतकरी मोर्चा काढतात आणि सरकार आश्वासन देते. त्यानंतर आम्ही माघार घेतो. पण यावेळी असे होणार नाही सरकारने मागण्यांबाबत आदेश काढून अंमलबजावणी करावी. नाहीतर आंदोलक वाशिंद येथून हलणार नाहीत, असे गावीत म्हणाले.

Nuksaan Bharpai मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसान भरपाईसाठी असा करा अर्ज

Farmers Protest : सरकार सकारात्मक

  • राज्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाली आहे.
  • यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांनी लाँगमार्च थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबईकरांना त्रास द्यायचा आमचा हेतू नाही

  • आम्ही सरकारच्या सकारात्मक निर्णयाची वाट पाहत बसून राहू.
  • सरकारने काहीही कार्यवाही केली नाही तर आम्ही पुन्हा मुंबईकडे चालत राहू.
  • मुंबईकरांना त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. मागण्या मान्य होत नाहीत तोवर परतायचे नाही असा निर्धार करून शिधा बांधून आलो आहोत.
  • त्यामुळे सरकारने आता आमच्याशी चर्चा केली त्याची अंमलबजावणी करावी, असे आमदार गावीत म्हणाले.

Land Records : वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली शेत जमिन परत मिळणार, फक्त 2 दिवसांत

शेतकऱ्यांच्या पायांना फोड… गुडघे दुखू लागले तरी जिद्द कायम!

Farmers Protest : कधी आग ओकणारा सूर्य… कधी पाऊस तर कधी थंडी तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईच्या दिशेने पायी चालत जाणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा तांडा ‘लाल वादळा’च्या रूपाने आज वासिंदमध्ये येऊन धडकला. कसलीही तमा न बाळगणाऱ्या अनेक कष्टकरी तसेच शेतकऱ्यांच्या पायांना फोड आले असून त्यांचे गुडघेही दुखू लागले आहेत. त्यातच आज पुन्हा एकदा अवकाळीचे संकट ओढवले. मात्र शेतकऱ्यांची जिद्द कायम असल्याचे दिसून आले. अजून किती तळतळाट घेणार, असा थेट सवाल बळीराजाने सरकारला केला आहे.

  • येवला, मालेगाव, वणी, सुरगाणा अशा विविध भागांतून निघालेला बळीराजाचा हा लाँग मार्च आज सकाळी शहापूर तालुक्यातील कळंबगाव येथे आला.
  • सकाळी नाश्त्याची तयारी सुरू असतानाच ढगांचा गडगडाट करीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एकच धांदल उडाली.
  • मोर्चेकरांना महामार्गावरील हॉटेल तसेच ढाब्यांचा आसरा घ्यावा लागला. त्यानंतर वातावरण एकदम बदलले आणि दुपारी तळपत्या उन्हात पुन्हा पायपीट सुरू झाली.
  • विविध मागण्यांसाठी ७० ते ८० किलोमीटर पायपीट झाल्याने अनेकांच्या पायांना जखमा झाल्या.
  • अनेकांचे गुडघे तसेच तळपाय दुखत असल्याने त्यांना चालण्यास त्रास होत आहे.
  • तरीही न्याय हक्क मिळवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जायचेच ही जिद्द त्यांच्या मनात कायम असल्याचे दिसून आले.

PM Awas Yojana : तुम्ही पण तुमच्या स्वप्नातले घर बांधू शकता

Government Job Update : तुमचं शिक्षण ह्या फील्ड मध्ये झालंय का? मग थेट केंद्रीय मंत्रालयात नोकरीची संधी; करा अर्ज

3 thoughts on “Farmers Protest : आश्वासन नको अंमलबजावणी हवी आणि ती घेतल्याशिवाय जाणार नाय!”

  1. Pingback: ST Mahamandal : महिलांनो, आजपासून सर्व प्रकारच्या ST बसमधून करा निम्म्या तिकीट दरात प्रवास - Indien Farmer

  2. Pingback: Retired MPs : 4,796 माजी खासदारांची पेन्शनबंद करा. - Indien Farmer

  3. Pingback: Unseasonal Rain : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!