Weather Info : शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाब डंख

Weather Info : शिवना येथेशेतकरी मेळावा

Weather Info : वेळोवेळी हवामानाचा अचूक अंदाज देऊन मी नैसर्गिक आपत्तीने तुमच्या एका रुपयाचेही शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डखयांनी शिवना (ता. सिल्लोड) येथे शेतकरी मेळाव्यात दिली.

👉खुशखबर कापसाचे भाव वाढणार👈

हवामानतज्ञ पंजाब डख यांचा नुकताच ग्रामस्थ व शिवाई देवी मंदिर विश्वस्त समितीतर्फे संस्थानचे अध्यक्ष सुभाष होळकर व बालाजी संस्थानतर्फे अध्यक्ष व्ही. के. राऊत, उपाध्यक्ष काशिनाथ काळे व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवना- धोत्रा रस्त्यावरील श्री गणेश रोपवाटिकेचे उद्घाटन करण्यात आले.

👉होळीच्या रंगाला महागाईचा तडका👈

Weather Info : पूर्वजांनी निसर्गाचे अनेक ठोकताळे दिलेले आहेत. लिंबाच्या झाडाला निंभोळ्या लगडणे, बिब्याच्या झाडाला बिबे लागणे, चिंचेच्या झाडाला चिंचा लगडणे, सरड्याच्या डोक्यावरील तुरा लाल होणे, घोरपडींनी बिळातून तोंड बाहेर काढणे, दुचाकी समोर पंख फुटलेले काजवे येणे अशी अनेक लक्षणे पावसाच्या आगमनाचा अंदाज देतात, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी पाऊस येण्याची वैज्ञानिक कारणे ही विशद केली. शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा, मका, कपाशी लागवड कशी करावी. कोणती खते, कीटकनाशके वापरावीत, पेरणीचे अंतर किती ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी. आर. राऊत, आभार संजय काळे यांनी मानले.

👉जाणून घ्या आपल्या भागातील हवामान👈

1 thought on “Weather Info : शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाब डंख”

  1. Pingback: Nafed शेतकऱ्यांनो! हरभरा नोंदणीला सुरुवात, मिळतोय विक्रमी भाव - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!