Soybean Market update : सोयाबीनच्या दरातील तेजी कायम जाणून घ्या बाजार भाव

Soybean Market update :

Soybean Market update : सोयाबीनमधील तेजी सद्य:स्थितीत कायम असून, सोयाबीनच्या दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरवाढीमुळे बाजारात सोयाबीनची आवकही आता वाढू लागली असून , मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची २० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली . गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनचा पेरा वाढल्यानंतर पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यात दरात कमालीची घसरण झाली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले . गतवर्षी सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळाली. आता नववर्षात हळूहळू दर सुधारत आहेत. पाच हजारांच्या आत असलेले सोयाबीनचे दर साडेपाच हजारांवर पोहोचले आहे. शेतकरी देखील खुश दिसतय आता दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढली आहे. मंगळवारी प्रमुख सहा बाजार समित्यांसह तीन उपबाजार मिळून जवळपास वीस हजार क्विंटल पेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. तथापि सोमवारच्या तुलनेत कारंजा बाजार समिती वगळता मंगळवारी बाजार समित्यांत सोयाबीनची आवक काही प्रमाणात कमीही झाल्याचे दिसून आहे.

👉मक्याच्या आवक मध्ये घट👈

Soybean Market update : शेतकऱ्यांना सात हजाराची अपेक्षा

काही दिवसांपूर्वी बाजारात सोयाबीनची आवक मंदावली होती. त्यात आता वाढ झाली आहे. दर सुधारल्याने आवक वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी म्हणावी तेवढी आवक होत नाही. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचा दर सात हजारांचा टप्पा गाठण्याची अपेक्षा असल्याने त्यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे. यात प्रामुख्याने बड्या शेतकऱ्यांचाच समावेश आहे.

👉रेल्वे भरती झाली सुरू👈

कारंजा बाजारात झाली सर्वाधिक आवक

सोयाबीनच्या दरात सतत वाढ होत असल्याने आता बहुतांश शेतकरी राखून ठेवलेले सोयाबीन विक्रीला आणत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली होती. या बाजार समितीत ५ हजार ५०० क्विटल सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीस आणले होते.

दरात सर्वात पुढे वाशिम

जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनला सरासरी साडेपाच हजार रुपये प्रती क्विटलपर्यंतचे दर मिळत आहेत. वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सोयाबीनला अधिक दर मिळत आहेत. या बाजार समितीत सोयाबीनला सोमवारी ५ हजार ८०० रुपये प्रती क्विटलपर्यंतचे, तर मंगळवारी ५ हजार ७०० रुपये प्रती क्चिटलपर्यंतचे दर मिळाले.

👉सोयाबीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

error: Content is protected !!