Soyabean Rate Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन दरात तेजी; ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 5600 चा दर, वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

शेतकऱ्यांसाठी मागील वर्षात खूप फटका बसला

Soyabean Rate Update : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यंदाच्या हंगामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. खरं पाहता, खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाला मोठा फटका बसला होता. सोयाबीन सह इतरही महत्त्वाची खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली होती. सोयाबीनला मात्र अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. नेहमी जेवढा उतारा बसत होता तेवढा उतारा या हंगामात सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना मिळाला नाही. दरम्यान उत्पादनात घट झालेली आहे पण वाढीव दरातून ही घट भरून निघेल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र मध्यंतरीचा काही काळ वगळला हात तर सोयाबीन दर संपूर्ण हंगाम भर दबावात राहिले.

👉कापूस उत्पादक शेतकरीच ठरतोय गेम चेंजर👈

Soyabean Rate Update : गेल्या वर्षाआखेर ला शेतकऱ्यांना थोडा दिलासा

मध्यंतरी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भावपातळीवर विक्री होत होता. विशेष बाब अशी की राज्यातील बहुतांशी बाजारात या कालावधीमध्ये सोयाबीनला 6500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा कमाल दर मिळत होता. मात्र गेल्या हंगामात सोयाबीन 7000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री झाला असल्याने या हंगामात देखील असाच विक्रमी दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला.

👉सोन्याचे भाव 57 हजार पार👈

Soyabean Rate Update : ह्या वर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल

विशेष बाब म्हणजे जाणकार लोक देखील सोयाबीन दरात या हंगामात तेजी राहील असा अंदाज बांधत होते. परंतु जाणकार लोकांनी गेल्या हंगामासारखा दर मिळणार नाही असं त्यावेळी देखील नमूद केलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा सोयाबीन दरवाढीसाठी पूरक परिस्थिती तयार झाली आहे. भारतातून विक्रमी सोयापेंड निर्यात होण्याचा अंदाज असल्याने सोयाबीन दरात वाढ होणार आहे.आज देखील बाजारात सोयाबीन दरात वाढ नमूद करण्यात आली आहे. आज वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन 5600 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दरात विक्री झाला आहे. राज्यातील इतर बाजारात मात्र सोयाबीन 5100 ते पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल च्या आसपासच विक्री झाला आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉जाणून घ्या काय आहे आजचे भाव👈

2 thoughts on “Soyabean Rate Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीन दरात तेजी; ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 5600 चा दर, वाचा आजचे बाजारभाव सविस्तर”

  1. Pingback: Onion Rate :कांदा 1500 वरून 600 रुपयांवर, आठ दिवसात भाव थेट निम्म्यावर. - Krushi Vasant

  2. Pingback: Cotton Rate Today : कापसाचे भाव आज, २1 फेब्रुवारीला कोणत्या बाजारात शेतकऱ्यांना निराशा ? कुठे मिळाला सर्वाधि

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!