Saffron Farming : महाराष्ट्रात संपूर्ण नियंत्रित पद्धतीने घेतले काश्मिरी केशर

महाराष्ट्रातील खुल्या वातावरणात येऊ न शकणारे, मात्र नियंत्रित आणि युरोपोनिक पद्धतीने केशर उत्पादन (Saffron Farming) घेण्याची नवी वाट शैलेश मोडक या युवकाने सुरू केली आहे.

एका बंदिस्त कंटेनर मध्ये थेट काश्मीरचे वातावरण (Kashmir Climate) निर्माण करून केशर हे पीक (Saffron Crop) घेण्याच्या आश्वासक प्रयोगाला पुण्यात मोडक यांनी यशस्वी केले आहे. इराण भारतात देखील असे प्रयोग होत आहेत. आणि तसेच प्रयोग महाराष्ट्रात देखील झाल्याने सर्वांच्या भवया उंचावल्या आहेत.

👉केशर उत्पादन कसे करावे.👈

तोळ्यावर विकल्या जाणाऱ्या मसाल्या मध्ये केशर चे महत्व (Importance of Saffron) भारतीय अन्नपदार्थात अत्यंत मोलाचे आहे. तीनशे ते पंधराशे रुपये पर्यंत केसर चा भाव बाजारात आपणास पाहावयास मिळतो. मात्र काश्मीर, हिमाचल प्रदेश अशा थंड आणि बर्फळ प्रदेशातच केसर चे उत्पादन (Saffron Farming) घेतले जाते. तरी भारतातील केशर उत्पादन अगदीच कमी आहे.

भारतीयांच्या मागणीच्या तुलनेत जर बघितल तर तीन ते चार टक्के एवढेच उत्पादन आपल्याकडे घेतलं जातं. बाकी 96% केशर ची आयात केली जाते. ही संधी लक्षात घेत मोडक यांनी या प्रयोगाचे महत्त्व देखील मोठं आहे. शैलेश यांनी या आधी परदेशी भाषा उदाहरणार्थ लेट्यूस, केल, पार्सेली यांचे उत्पादन घेतले आहे.

👉केशर उत्पादन कसे करावे.👈

कंटेनर किंवा बंदिस्त असलेल्या हरितगृह मध्ये संपूर्णपणे वातावरण नियंत्रित करता येत असल्यामुळे ताकत्विक दृष्ट्या कोणत्याही पिक घेणे शक्य असते परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन खर्च अधिक असल्यामुळे त्यातून आर्थिक दृष्ट्या अधिक फायदा मिळेल अशाच पिकांची निवड करावी असे शैलेश मोडक यांनी सांगितले.

संपूर्ण नियंत्रित पद्धतीने करण्यायोग्य देशी आणि नाविन्यपूर्ण पिकांचा शोध घेताना त्यांना केशर (Saffron) या काश्मीरमध्ये मर्यादित असलेल्या पिकाची माहिती समजली. त्यानंतर एका 320 वर्ग फुटाच्या कंटेनर मध्ये तयार करून संपूर्ण नियंत्रित आणि एरोपोनिक पद्धतीने मोडक यांनी केशर उत्पादनांचा प्रयोग यशस्वी केला आहे.

👉केशर उत्पादन कसे करावे.👈

आता त्यांचे उत्पादन नुकतेच सुरू झाले आहे. एका ट्रेन मधून सरासरी सुमारे 1.93 ते 2 ग्राम इतकं केशर मिळू लागले आहे. या पिकाचे प्रोटोकॉल अधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचे नियोजन ते करत आहे.

1 thought on “Saffron Farming : महाराष्ट्रात संपूर्ण नियंत्रित पद्धतीने घेतले काश्मिरी केशर”

  1. Pingback: Onion Plant : बुरशीमुळे महागाचे बियाणे जमिनीतच - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!