Pune-Aurangabad Expressway; जमीन संपादित केल्यानंतर किती मोबदला दिला जाईल ?

आता हा रेट त्या ठिकाणच्या जमिनीनुसार ठरत असतो. परंतु बऱ्याच जणांना आपल्या जमिनीचं मूल्य किती आहे? ते कुठे आणि कस पाहायचं ? हे माहिती नसतं… तुम्ही महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर कोणत्याही शुल्काशिवाय रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) सहजपणे शोधू शकतात. रेडी रेकनर दर म्हणजे नेमक काय ? आणि तो ऑनलाइन कसा पाहायचा असतो ? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला देखील याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेली माहिती सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचा…

नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमीन संपादित केल्यानंतर किती मोबदला दिला पाहिजे ? आणि त्याचे मूल्यांकन कसे करावे ? याबाबत तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादन एक तर ग्रामीण भागात किंवा शहरी भागात अशा दोनच भागात होत असते. या दोन्ही भागांमध्ये मिळणारा भूसंपादनाचा मोबदला हा वेगवेगळा असतो. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ही नवीन भूसंपादन कायदा 2013 च्या कलम 25 ते 30 यामध्ये नमूद केलेली आहे. त्यामधील कलम 26 नुसार जमिनीचे मूल्य ठरवायचे असेल तर शहरी भागात एक(१) हा गुणक अवयव व ग्रामीण भागाच्या जमिनीसाठी दोन (२) हा गुणक अवयव ठरवला गेलेला आहे.

आपण जमिनीचा मोबदला ज्याला solatium असे म्हणत असतात ते कसे ठरवतात ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया– उदा . एखाद्या व्यक्तीची जमीन ही ग्रामीण भागामध्ये आहे आणि त्याचे मूल्य बाजारभावाप्रमाणे 25 लाख रुपये एवढे आहे. तर ग्रामीण भागातील गुणक अवयव 2 आहे. तर 25,00,000 × 2 = 50,00,000. म्हणजेच त्या जमिनीची योग्य किंमत झाली 50 लाख रुपये. आता यापुढे जाऊन जमिनीत सागवान झाडे आणि बोरवेल असेल तर याची किंमत कलम 29 प्रमाणे 15,00,000 रुपये इतकी असेल.(५०,००,००० + १५,००, ००० = ६५,००,०००) आता एकूण रक्कम 65 लाख रुपये झाली आहे. यापुढे जाऊन कलम 30 (1) अन्वये दिलासा रक्कम म्हणून solatium रक्कम 100% एवढी दिली जाते. म्हणजेच 65,00,000 +65,00,000 = 1,30,00,000 अशाप्रकारे मूल्यांकन करून नमूद मोबदला ग्रामीण भागातील शेतकऱ्याला मिळू शकतो. एवढंच नाही तर कलम 4 ची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून मोबदला रक्कम ही प्रत्यक्षात हातात मिळेपर्यंत कलम 30 (2) अन्वये जमिनीच्या मूळ रकमेवर म्हणजेच 25 लाखावर 12 टक्के या दराने व्याज देखील दिले जाते. शहरी भागात देखील याचप्रमाणे ही सोलाटियम रक्कम काढले जाते फक्त वरील गुणक अवयव दोनच्या ऐवजी एकच असतो.

रेडी रेकनर दर हा ऑनलाइन पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या (Revenue Department) अधिकृत वेबसाइटवर सुविधा उपलब्ध आहे. हे पाहण्या साठी, सर्वप्रथम कोणतेही इंटरनेट वेब ब्राउझर उघडावे. यानंतर igrmaharashtra.gov.in ही वेबसाइट उघडावी. तुमच्या सोयीसाठी, आम्ही या वेबसाइटची थेट लिंक येथे उपलब्ध करत आहोत, जेणेकरून तुम्ही थेट वेब पोर्टलवर जाऊ शकतात

इथे क्लिक करा

igr maharashtra ची अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रीनवर एक नकाशा दिसेल. यामध्ये महाराष्ट्रातील तोच जिल्हा निवडा ज्या जिल्ह्याचा तुम्हाला रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) पाहायचा आहे. उदाहरणार्थ – औरंगाबाद.

आता सर्वात आधी वर्ष निवडावे. जसे की – 2021 – 2022 या नंतर तालुका (Taluka) निवडावा. आणि नंतर तुमच्या गावाचे नाव निवडावे. सर्व डिटेल्स निवडल्या नंतर, रेडी रेकनर दर (Ready Reckoner Rate) तुमच्या स्क्रीनवर उघडेल. तुम्ही तो पाहू शकतात…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!