PM Sraksha Vima Yojana

PM Suraksha Vima 2023 :वीस रुपये वार्षिक भरून दोन लाखाचा विमा

PM Suraksha Vima 2023 दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशावेळी पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशावेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णतः अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतात. बँक खातेधारकांनी बँकेत साधा अर्ज करावा. खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक बँकेत हा अर्ज भरून घेण्याची सूचना आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा.

  • खाते हे कोणत्याही बँकेत जरी असले तर एक साधा अर्ज बँकेमध्ये करून या योजनेचा लाभा घेता येतो.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून.
  • मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करून आता फक्त वीस रुपये करण्यात आला आहे.
  • भारताच्या फक्त 20% लोकांजवळच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे.
  • जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत 11 लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
  • या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता जास्तीत जास्त बँक खातेदारांनी यामध्ये सहभागी व्हावे हा या योजनेचा मूळ ध्येय आहे.
PM Sraksha Vima

आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा…

विमा कोणास अनुज्ञेय आहे

  • PM Suraksha Vima 2023 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • वय वर्ष 18 खालील असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • वय वर्ष 70 च्या पुढे असेल तर अशावेळी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • 18 ते 70 या वयोगटातील सर्व व्यक्तींना या योजनेचा लाभ हा घेता येतो.
  • लाभार्थ्याची बँकेत खाते असणे या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक आहे.
  • योजनेसाठी वार्षिक हप्ता हा 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल.
  • हप्त्यासाठी आर्थिक वर्ष 1 जून ते 31 मे असेल.
  • प्रत्येक बँकेत यासंदर्भातील अर्ज हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.
  • तेव्हाच या योजनेचा लाभ हा घेता येईल.
Maharashtra Land Right Proofs

पती-पत्नी या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकतात

PM Suraksha Vima 2023 वैशिष्ट्य

  • लक्षगट-अपघात विमान नोंदवलेले सर्व नागरिक या योजनेचे लक्ष गट आहे.
  • वय व पात्रता-18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • लाभार्थ्याची बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
  • हप्ता-योजनेचा वार्षिक हप्ता वीस रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होणार आहे.
  • हप्त्यासाठी आर्थिक वर्ष हे 1 जून ते 3 मे हे असणार आहे.
  • विमा लाभ-लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल.
  • लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये अर्थसहाय्य या योजनेमधून दिले जाते.
  • खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा योजनेमध्ये आहे योजना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीशी सलग्न आहे.
  • व्यवस्थापन-योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एलआयसी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.

अशा प्रकारे अवघे वीस रुपये भरून या योजनेचा लाभ हा घेऊ शकता.

Income Sources Of Panchayati Raj 2023 :ग्रामपंचायतीकडे पैसे कुठून येतात?

Cibil Score Loan 2023 1:उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशांचं काय झालं?

1 thought on “PM Suraksha Vima 2023 :वीस रुपये वार्षिक भरून दोन लाखाचा विमा”

  1. Pingback: PM Suraksha Vima Yojana :20 रूपयात 2 लाखाचा विमा - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!