Onion Rate : राज्यात सध्या लाल कांद्याच्या दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. येत्या दहा दिवसांत सरकार सभागृहात शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा करेल, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला आहे.
Onion Rate : सत्तार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोतलाना त्यांनी राज्यात केंद्रीय कृषी विद्यापीठ व्हांव, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली.

तुम्हाला मुलगी असेल तर मिळतील ७५०००
यावेळी सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळाला नाही, तर मला वाईट वाटते. त्यामुळे मी शेतकऱ्यांची माफी मागतो. येत्या दहा दिवसात याप्रश्नी तोडगा निघेल.

कांद्याच्या दराबाबत सत्तार यांनी सांगितले की, सध्या नाफेडची ४० खरेदी केंद्रे सुरू असून नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. रशिया आणि युक्रेनच्या युध्दामुळे ही परिस्थिती आहे.
तसेच राज्य सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचे, याचाही विचार करत आहे. अधिवेशन संपण्याअगोदर यावर तोडगा काढला जाईल, असेही सत्तार यांनी सांगितले.

आता धान्याऐवजी मिळणार 36 हजार रुपये
दरम्यान, सांगलीमधील खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ई-पॉस मशिनमध्ये जातीची विचारणा केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले होते.
विरोधकांनी या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. या संदर्भात मी केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बोललो असून याबाबत ते लवकरच निर्णय घेतील, असे सत्तार यांनी सांगितले.
Nashik Municipal Corporation Recruitment : नाशिक महानगरपालिकेत 14000 जागांसाठी भरती
Free Sewing Machine Scheme : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन