Onion Market : ८२५ किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात एक कवडी ही पडला नाही, उलट व्यापाऱ्यानेच १ रुपया मागितला

Onion Market : गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याची शेती करणाऱ्या बळीराजावर संक्रांत आल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. एकूणच कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्यास ५०० किलो कांदा विकल्यावर अवघ्या २ रुपयांचा चेक देण्यात आला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एका शेतकऱ्याच्या बाबत असाच प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याने ८२५ किलो कांदा विकून काहीही रक्कम हाती आली नाही. हमाली, तोलाई, गाडी भाडे याचे सर्व पैसे वजा करून शून्य रुपये हाती आले. उलट शेतकऱ्याच्या अंगावर एक रुपया चढला. त्यामुळे शेतकऱ्याला सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला एक रुपया देऊन रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. या व्यवहाराच्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

👉पाढर सोन उजळणार👈

सोलापूर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी एक रुपया वजा असलेली शेतकऱ्याची पट्टी फेसबुकवर पोस्ट केली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, १ फेब्रुवारी रोजी बंडू भांगे या शेतकऱ्याने सोलापूर कृषी बाजार समितीत जवळपास ८२५ किलो कांदा विकला. परंतु दर घसरल्याने कांद्याला योग्य भाव मिळाला नाही आणि सर्व पैसे वजा करून शेतकऱ्याच्या हाती काहीही आले नाही.

कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण :

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन महिन्यांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोलापुरवरुन कांदा , आंध्रप्रदेश, कर्नाटक, चेन्नई, तेलंगणा आदी भागात निर्यात केला जातो. या राज्यातील व्यापारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत, उत्तम दर्जाच्या कांद्याची मागणी करतात. सर्वच शेतकऱ्यांकडे उत्तम दर्जाचा कांदा असतो असे नाही. काही कांदा, बारीक, किंवा पापुद्रे निघालेला कांदा देखील असतो. कांद्याची वाढती आवक, निर्यात कमी ,यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

👉512 किलो कांदा विकला, तब्बल 2 रू चा चेक दिला.👈

Onion Market : ८२५ किलो कांदा विकून शेतकऱ्याला एक कवडीही हाती नाही आली

सोलापूर जिल्ह्यातील दाउतपूर येथील बंडू भांगे या शेतकऱ्याने १ फेब्रुवारी रोजी एस. एन. जावळे या कांदा व्यापाऱ्याकडे ८२५ किलो कांदा विक्रीसाठी आणला होता. या कांद्याला प्रतिक्विंटल १०० रुपये दर मिळाला. म्हणजेच ८२५ किलो कांद्याची एकूण रक्कम झाली ८२५ रुपये. हमाली झाली ६५.१८ रुपये, तोलाई झाली ३८.७८ रुपये, इतर हमाली झाली २५.५० रुपये, मोटार भाडे झाले ६९७ रुपये असा एकूण ८२६ रुपये खर्च झाला. त्यामुळे शेतकऱ्याला उलट व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आणि रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.

Onion Market : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपयांचा दर द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. किरकोळ मार्केट मध्ये आजदेखील कांदा १५ ते २० रुपये दराने विकला जातो. कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी एक रुपया किंवा दोन रुपये प्रतिकिलो लिलाव करत शेतकरी वर्गाची थट्टा करत आहेत. राज्य शासनाने त्वरित शेतकऱ्यांना अनुदान देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.

👉जाणून घ्या काय आहे आजचे कांद्याचे भाव👈

1 thought on “Onion Market : ८२५ किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात एक कवडी ही पडला नाही, उलट व्यापाऱ्यानेच १ रुपया मागितला”

  1. Pingback: Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो पाच तारखेला पावसाची दाट शक्यता तुमच्या शेतात हरभरे व गहू असेल तर काढणीला लाग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!