Electricity Bill ग्राहकांना बसणार ‘झटका’; वीजबिलात होणार १५ टक्के वाढ

Electricity Bill वीजबोजा कमी करण्यासाठी महावितरणला हवीय ३७ टक्के दरवाढ. महावितरण तोट्यात जात असल्याने त्यांनी ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे; परंतु आयोगाने हरकती, सूचना मागविल्यानंतर राज्यभरात दरवाढीचा विरोध झाला आहे. त्यामुळे किमान १५टक्के दरवाढीची शक्यता वर्तविली जात आहे.

महावितरणच्या तुटीची भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव

महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरवाढ होऊ नये, म्हणून वीजबिलांची होळी करण्यात आली. तसेच वीज आयोगाने सुनावणी घेतली होती, त्यामध्येही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महावितरणच्या तुटीची भरपाई करण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दिला होता. त्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातून सूचना व हरकती मागविल्या.

वीजबील न भरणाऱ्या ग्राहकांमुळे वीज बोजा वाढला

महावितरणने वीज दरवाढ ही ३७ टक्के म्हणजे २.५५ रुपये प्रति युनिट आहे, जी परवडणारी नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरणला जो तोटा सहन करावा लागत आहे, तो कमी करण्यासाठी ही दरवाढ होत आहे. मुळात वीज बिलांची वसुली घरगुती पातळीवर कठोरपणे केली जाते, मात्र वीजबील न भरणाऱ्या ग्राहकांमुळे वीज बोजा वाढत आहे. त्याचा भार सामान्यांवर टाकत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Electricity Bill प्रस्तावित बदल (रुपयांमध्ये)

ग्राहकवर्गवारीसध्याचे दर(२०२३-२४) प्रस्तावित दर(२०२४-२५)
स्थिर आकार १०५ ११८ १३२
वहन आकार (प्रतियुनिट)१.३५ १.४३ १.४४
०-१०० युनिट ३.३६ ४.५० ५.१०
५०० युनिटहून अधिक ११.८६ १६.३० १८.७०

Child Aadhar Card : घरबसल्या बनवा तुम्ही तुमच्या मुलांचे आधार कार्ड

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!