Crop Insurance हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर, जिल्ह्यांची यादी पहा…

 Crop Insurance नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात असते. सन 2022 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हजार 345 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

                  यासंदर्भातच एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? 

                    या शासन निर्णयाद्वारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जिरायत शेतीच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर क्षेत्रावर तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे.

                बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर क्षेत्रावर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर क्षेत्रावर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत ?

                   जालना जिल्ह्यातील 6,898 शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील 1,557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी 60 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यांमध्ये 12,370 शेतकऱ्यांसाठी 157 कोटी 4 लाख रुपये आणि नांदेड जिल्ह्यामधील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख रुपये. 

                  लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी 3037 कोटी 30 लाख रुपये, तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे. एकूण औरंगाबाद विभागासाठी 10 लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांसाठी 1 हजार 8 कोटी 30 लाख रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे. 

                   नाशिक जिल्ह्यमधील 18,467 शेतकर्यासाठी 11 कोटी 24 लाख रुपये. धुळे जिल्ह्यामधील 4,497 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 39 लाख रुपये. नंदुरबार जिल्ह्यामधील 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये, तर जळगाव Crop Insurance जिल्ह्यामधील 11,424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी 21,410 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 91 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

2 thoughts on “Crop Insurance हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर, जिल्ह्यांची यादी पहा…”

  1. Pingback: Pik Nuksaan Yadi पीक नुकसानाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात , असे पहा यादीमध्ये आपले नाव - Krushi Vasant

  2. Pingback: Ativrushti Yadi 2022 अतिवृष्टी नुकसान या जिल्ह्याची लाभार्थी यादी आली - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!