Cotton Market Update : कापूस उत्पादक शेतकरीच ठरतोय गेम चेंजर

Cotton Market Update कापसाच्या बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली आहे. तर दुसरीकडे कापड उद्योगाला कमी दरात कापूस हवा आहे. या साऱ्या घडामोडीत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस उत्पादक शेतकरीच यंदाच्या हंगामातील गेम चेंजर असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.

सोयाबीनच्या दरातील तेजी कायम जाणून घ्या बाजार भाव

जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतीय बाजारातच कापसाचे दर तेजीत असल्याचा दावा कॉटन असोसिएशनकडून केला जात आहे. सध्या कापसाला ८४०० रुपये क्‍विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना गेल्या हंगामाप्रमाणे कापसाला दहा हजार रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.त्याच अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबविली आहे. परिणामी देशांतर्गंत बाजारात केवळ १ ते १ लाख १० हजार गाठी इतकी अत्यल्प आवक होत असल्याचे सीएआयचे म्हणणे आहे.महाराष्ट्रात देखील प्रक्रिया कामी अवघा २५ टक्के कापूस जिनिंग व्यावसायिकांकडे पोहोचला आहे.

मोहरी, कातडी आणि तेलाचा भाव मंदावला, पाहा आजचे ताजे दर

Cotton Market Update

तब्बल ७५ टक्के कापसाचे होल्डिंग शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात केले आहे, अशी माहिती पणन महासंघाचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर गोस्वामी यांनी दिली. महाराष्ट्रात ४०० लाख क्विंटल कापूस उत्पादकता होते . आतापर्यंत दीडशे लाख क्विंटल कापूस तयार झाल्या आहेत.त्याचा सर्वाधीक फटका कापड उद्योगाला बसला आहे . कापड उद्योगाला आपले मार्जीन वाढावे याकरिता कमी दरात कापूस हवा आहे.जागतिकस्तरावर भारतीय कापसाचे दर अधिक असले तरी निर्यात केल्यास ११ टक्‍के आयात शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.त्यामुळे सध्यातरी भारतीय कापूस उत्पादकांकडून खरेदीची मानसिकता वस्त्रोद्योगाची आहे, अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी दिली. रुईच्या दरात घसरण झाली असली तरी देशांतर्गत शेतकऱ्यांनी कापूस होल्ड करून ठेवला आहे. त्याच्या परिणामी कापसाचे दर यापुढील काळात वाढतील यात शंका नाही. शेतकऱ्यांनी पैशाची गरज असल्यास टप्याटप्याने कापसाच्या विक्रीचे धोरण ठेवावे.

👉कापसाच्या रोजच्या ताज्या भावासाठी इथे क्लिक करा 👈

error: Content is protected !!