Cotton Market update : कापूसाच्या उतरत्या भावामुळे कट्टीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फटका

Cotton Market update :

Cotton Market update : खुल्या बाजारात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अर्धा किलोचे नुकसान सहन करावे लागत आहे. कट्टीच्या नावाखाली खरेदीदार व दलाल प्रति क्विंटल अर्धा किलोची रक्कम कापत आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर कापसाचा बाजार गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्यासोबतच बाजार समितीचाही सेस बुडत आहे.या महिन्यात कापसाची आवक मर्यादित आहे. खासगी खरेदीदारांनी आकडे लपवण्याचा फंडा अंमलात आणला आहे.कापसाच्या स्थानिक बाजारात १३ जिनिंग प्रेसिंगपैकी गंगा कॉटस्पिन, शेतकरी सहकारी, नेमाणी, लढ्ढा व एदलजी या जेमतेम पाच जिनिंग सध्या सुरू आहेत. डिसेंबरपर्यंत कापसाची आवक अत्यंत अल्प होती, ती आता किंचित वाढली आहे.

यावर्षी कापसाचा बाजार उशिरापर्यंत चालणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. गत महिन्यापर्यंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची स्थिती वाईट होती. १५०० क्विंटल खरेदीची क्षमता असलेल्या व २४ ते ३६ मशिन असलेल्या जिनिंगवर दहा दिवस खरेदी केल्यानंतर एक दिवस गलाई करण्यात आली. त्यांना यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला आहे. एदलजी व लढ्ढा जिनिंग वगळता उर्वरित तीन फॅक्टरींची खरेदी फार कमी आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे मोठी भरती

शहरात अवैध रेचे जोमात सुरू झाले असून त्यांच्याकडे दररोज किती खरेदी झाली याची मोजदाद नाही.परवाना नसताना काही दलाल या व्यवहारात सक्रिय झाले असून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून तो जिनिंगला विकण्याचा व्यवसाय जोमात सुरू झाला आहे.हे दलाल शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना प्रति क्विंटल अर्धा किलो कट्टी कापत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

Cotton Market update : जिनिंग फॅक्टरींना दिल्या नोटीस

सेस बुडत असल्याने खरेदीदारांनी खरे व वास्तविक आकडे द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत बाजार समिती प्रशासनाने जिनिंग प्रेसिंग फॅक्टरींना नोटिसा दिल्या आहेत.याशिवाय बाजार यार्डमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असून इलेक्ट्रॉनिक काटा खरेदी करण्यात येत आहे. मार्च महिन्यात कापसाचा बाजार समितीत सुरू होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले.

👉कापसाचे रोजच्या बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

1 thought on “Cotton Market update : कापूसाच्या उतरत्या भावामुळे कट्टीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फटका”

  1. Pingback: Tur update : २७ जानेवारीला या तीन बाजारांमध्ये मिळाला तुरीला चांगला भाव जाणून घ्या कोणत्या बाजारात भेट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!