Vastushastra Tips: घरात ठेवा या मूर्ती, तुम्हाला करू शकतात मालामाल, होईल चौफेर प्रगती…

         बहुतांश घरांमध्ये घर सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. यामधील काही मूर्ती ह्या देवीदेवतांच्या असतात. तर काही मूर्ती ह्या प्राण्यांच्या देखील असतात. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या मूर्ती घरात ठेवल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव देखील पडू शकतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की, घरामध्ये कुठल्या मूर्ती ठेवणे हे शुभ ठरू शकते.

Vastushastra Tips             वास्तुशस्त्रानुसार जर घरामध्ये पितळेच्या गाईची मूर्ती ठेवली तर संततीसुख प्राप्त होते. तसेच घरातून नकारात्मक उर्जा देखील दूर होते.

                  

        वास्तूशास्त्रानुसार गेस्टरूममध्ये हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवणं हे देखील शुभ असते. असे केल्याने आर्थिक लाभ तर होतातच परंतु त्याशिवाय घरामध्ये बदकाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर दाम्पत्यजीवन देखील सुखी आणि आनंदी राहते

            वास्तूशास्त्रानुसार उत्तर दिशेला जर पोपटाची मूर्ती ठेवली तर घरामध्ये सुख शांती ही कायम राहते. तसेच वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंद कायम राहतो. त्याशिवाय सौभाग्यात देखील वृद्धी होत असते.


                 धार्मिक मान्यतेनुसार कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. तसेच जिथे कासव असते, तिथे माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं अशी श्रद्धा असते. वास्तुशास्त्रानुसार कासवाला घराच्या पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवलं पाहिजे. त्याशिवाय ड्रॉईंग रुममध्ये धातूचा कासव ठेवल्याने धनवृद्धी होते.


            वास्तू शास्त्रानुसार मासा हा धन आणि ऊर्जेचं प्रतीक . आहे. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने घरात शांततेचा वास राहतो. तसेच धनवृद्धीही होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!