Vastushastra tips: घराच्या सजावटीसाठी चुकून देखील ‘ही’ चित्रे वापरू नका, होईल आर्थिक नुकसान!

 Vastu Shastra : 

              वास्तुशास्त्र हे आपल्या परिचयाचे आणि अभ्यासाचे नसेलच, परंतु चित्र निवडताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार आणि तर्क आपल्याला नक्कीच करता येईल.

               आपले घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक आणि मनोवेधक चित्रांची निवड करत.असतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवत असतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे देखील लावतो, जी डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ती आपल्या घरासाठी बाधक असतात. म्हणूनच घरात सकारात्मक चित्रांबरोबरच वास्तुशास्त्राला अनुकूल ठरतील, अशाच चित्रांची निवड करायला हवी.



             वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेल, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार आणि तर्क आपल्याला नक्कीच करता येतील. म्हणूनच युद्धाचे प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं आणि जंगली श्वापदे यांची चित्र कधीच घरात ठेवू नये. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊनच निवड करायला हवी. जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी यांसारखी देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरत असतात, तेवढेच घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाही. त्यात देखील वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतातच. 

 1.कारंजे किंवा धबधब्याचे चित्र 

               ही चित्र दिसायला सुंदर असतात, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे देखील व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जात असतो. 



2.जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र 

                 वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच अशी चित्र घरात लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बर्‍याचदा वापरले जाते असते, परंतु अन्य कोनत्याही ठिकाणी हे चित्र लावताना एकदा सल्ला जरूर घ्याावा.

3.मत्स्यालय किंवा माशाचे चित्र



               काही लोक घरात मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु ते देखील उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडत असतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नये, तर त्याचे घरावर आणि आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्यावी आणि मगच लावावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!