Vastushastra : हातात पैसा टिकत नसेल तर मग ‘हे’ उपाय एकदा करून बघाच, म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

            कितीतरी लोकांकडून तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, की “माझ्या हातात पैसाच टिकत नाही”. त्यासाठी ते बरेचदा आर्थिक जबाबदारी घेणे देखील टाळतात. कदाचित तुम्ही देखील त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतातच असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्या सारखे काही ना काही निमित्ताने ते खर्च होत असतात. अचानक काही आरोग्याच्या तक्रारी, घरातली काही छोटी-मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे असे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जात असतो. एवढे कष्ट घेऊन देखील पैसा जर टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविक आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला हा तोडगा आजमावून तर बघा….. 


                 आजच्या या महागाईच्या काळात जर पैसा हातात टिकत नसेल तर ही अतिशय चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा तर बदलून बघा असे वास्तुशास्त्र सुचवते आणि कसे ते सविस्तर जाणून घेऊया.


पैसा कधीच एका जागी ठेऊ नका : 
               हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आणि आजी आठवली असेल ना. हो त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात आणि कधी माळ्यावर. याचे कारण हेच आहे, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडत असतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरत असतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या हेतूने तजवीज करत असतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगत असते.


घरात या दिशेला पैसे ठेवावे :

               वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेला देवतांचा संबंध आहे. आणि या दिशांना देवतांचा वास असतो. म्हणून अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे खूप शुभ असते. तुम्हाला जर हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला देखील तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ तर होतेच आणि या शिवाय अनावश्यक खर्चावर देखील नियंत्रण राहते. 


घरात या दिशेला पैसे कधीच ठेऊ नये
                वस्तूशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी कधीच ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतच असते या शिवाय संपत्तीची वाढही थांबत असते. आणि बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होत जातो. म्हणूनच तिजोरी दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा हा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध रहावे आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वाढ होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!