Vastu tips for Ants:
घरात मुंग्या आल्याने आपण अनेकदा अस्वस्थ होत असतो. आपल्या त्रासाचे कारण म्हणजे अन्नपदार्थ खराब होणे, कपड्यांमध्ये मुंग्या अडकणे. पण वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातून मुंग्या वारंवार बाहेर पडत असतील तर तुमच्या आयुष्यात काही बदल होणार आहेत. या मुंग्या काळ्या किंवा लाल रंगाच्या असू शकतात. तुमच्या घरात कोणत्या प्रकारच्या मुंग्या आल्या आहेत, त्यानुसार त्या कशाचे लक्षण आहेत हे कळू शकते. काळ्या मुंग्यांना अन्न देणे हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत पवित्र कृत्य मानले जात असते आणि त्यामुळेच लोक त्यांच्यासमोर साखर, मैदा असे अन्नपदार्थ ठेवत असतात. प्रत्येक मुंगी वेगळ्या प्रकारच्या घटनेचे प्रतीक आहे.
Vastu tips for Ants: घरात निघणाऱ्या मुंग्या देतात भविष्याचे हे संकेत |
या मुंग्या काय सूचित करतात?
तांदळाच्या भांड्यातून काळ्या मुंग्या निघत असतील तर हे धनसंपत्तीच्या आगमनाचे लक्षण आहे. यासोबतच आर्थिक विवंचनेतून सुटून घर भरून येण्याचे देखील लक्षण आहे.
सामान्यतः घरात काळ्या मुंग्या असणे हे सुख आणि ऐश्वर्य यांचे लक्षण मानले जात असते. जर या मुंग्या तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेकडून आल्या तर तुमच्या परदेश प्रवासाचे योग देखील बनू शकतात.
जर तुमच्या घरात लाल मुंग्या दिसल्या तर मात्र सावधान. लाल मुंग्या हे अशुभ लक्षण मानले जाते. मुंग्या भविष्यातील त्रास, विवाद, पैसे खर्च करणे देखील सूचित करत असतात.
जर लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन घरातून बाहेर पडत असतील तर ते शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमच्या घरात काही प्रगती होणार आहे.