Onion Farmers कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे गडगडलेले भाव शेतकऱ्यांचे झालेला नुकसान या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणार

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली होती. ज्या समितीला आज 8 मार्च 2023 रोजी आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं. ज्याच्यामध्ये फेब्रुवारी पर्यंत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये कांद्याला मिळालेले बाजार भाव, बाजूच्या राज्यामध्ये कांद्याला मिळालेले बाजार भाव, एकंदरीत झालेले उत्पादन, शेतकऱ्यांचा झालेला नुकसान, लागणारा खर्च या सर्वांसमतातील अभ्यास करण्यासाठी ही समिती घटित करण्यात आली होती.

विधानसभेत शेतकर्‍यांच्या हितासाठी घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय

मित्रांनो हीच समिती आज 8 मार्च 2023 रोजी राज्य शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) दिलासा देण्यात काही निर्णय घेतले जाणार आहेत. तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावं अशा प्रकारचे मागणी केली जाते. आणि याच पार्श्वभूमी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018-19 प्रमाणे 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले जाईल अशा प्रकारचे शक्यता आहे.

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

1 thought on “Onion Farmers कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा”

  1. Pingback: Kanda Anudan : कांदा सानुग्रह अनुदानात केली वाढ, शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा - Krushi Vasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!