Land Record: 1880 पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पहा…

आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती. दिवसेंदिवस या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. आता आपल्याकडे ही माहिती कुठे असते. तर तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा, खाते उतारा, फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्प अंतर्गत राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटी अभिलेख (Land Record) उताऱ्यांचा संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. पण हे उतारे ऑनलाइन कसे पाहायचे याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

👉जुने सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन बघा 👈

Maharashtra Land Record

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन करा. या पेजवरील रेकॉर्डच्या पर्यावर तुम्हाला Click करायचा आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता. तुम्ही जर आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वापर कर्ता या पर्यायावर Click करायचा आहे.

👉ऑनलाईन सात बारा पहा.👈

एकदा का तुम्ही तिथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर Open होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायचे आहे. त्यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचा आहे. त्यानंतर जेंडर Male आहे की Female, Nationality म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करता ते सांगायचं आहे. मेल आयडी आणि जन्मतारीख लिहायचे आहे. एकदा का वैयक्तिक माहिती भरून झाले की तुम्हाला पत्त्याविषयीची माहिती द्यायची आहे. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक म्हणजे तुम्ही कितव्या मजल्यावर राहता, इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे. त्यानंतर Pin Code टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप येऊन जातं. पुढे गल्लीचे नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचे नाव टाकायचा आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक login ID क्रिएट करायचा आहे.

👉जुना फेरफार उतारा पहा👈

Old Land Record

आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया. हे पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव निवडायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा सात जिल्ह्यांपूर्वीच उपलब्ध करून दिलेली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. पुढे तालुका गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा क्रमांक टाकून शोधल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर शोध निकाले या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांक अशी संबंधित फेरफाराची माहिती पाहू शकतात.

👉ऑनलाईन Land Record पहा.👈

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या पर्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमचं कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश नावाचे तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिलेली आहे. त्या समोरील फाईल पहा या पर्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982 फेरफार पत्रक ओपन होईल. या पत्रकावरील खालील बाबी नसल्याचे नाव तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल. आता तुम्ही स्क्रीनवर १९८२ सालचा फेरफार उतारा होऊ शकतात. यात जमिनीचे अधिकार अभिलेखात काय बदल झाले, नेमका जमिनीचा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला, आणि तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा, उतारा आठ असे जमीन पूर्वी सांगितले ते 58 अभिलेखाच्या प्रकारांपैकी एक प्रकार निवडून त्याचीही माहिती होऊ शकतात.

2 thoughts on “Land Record: 1880 पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पहा…”

  1. Pingback: Land Acquisition: सुरत-चेन्नई मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण होणार - Krushi Vasant

  2. Pingback: Sattelites : आपला 7/12 सुरक्षित, जमीन चोरणे व हडपने पडेल महागात - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!