Sukanya Samriddhi Yojana:- मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ‘या’ योजनेत गुंतवणूक करावी!!!! अधिक माहिती जाणून घ्या….

           सध्याच्या काळात आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची खूपच आवश्यकता आहे. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana) हा एक उत्तम पर्याय आहे. सुकन्या समृद्धी योजनेंत (sukanya samriddhi yojana) मुलींचे खाते जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंतच उघडता येते. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच उघडता येते असते. जुळी किंवा तिहेरी मुले जन्माला आली तर दोनपेक्षा जास्त खाती उघडता येऊ शकतात.

            सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या वार्षिक 7.6% व्याज मिळते. या योजने मध्ये 250 रुपयांत खाते उघडता येते. आणि एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला देणे आवश्यक आहे. ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही उघडता येऊ शकते. 21व्या वर्षी कालावधी पुर्ण होतो
            मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर किंवा मुलीचे लग्न झाल्यानंतर खाते मॅच्युअर(mature) होते आणि तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च झाल्यास 18 वर्षानंतर सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 50% पर्यंत रक्कम काढता येते. याशिवाय मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीच्या लग्ना साठी देखील पैसे काढता येऊ  शकतात.

5 वर्षानंतरही खाते बंद करता येते 
                खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी बंद केले जाऊ शकते. हे बऱ्याच परिस्थितींमध्ये देखील केले जाऊ शकते, जसे की एखाद्या धोकादायक आजाराच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही कारणामुले खाते बंद केले जात असेल तर त्यास परवानगी दिली जाऊ शकते. परंतु, त्यावरील व्याज बचत खात्यानुसार असते. 

कर सवलतीचा लाभ मिळतो 
             चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80C च्या अंतर्गत कर सूट मिळू शकते. या अंतर्गत तुम्हाला 1.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!