Sports News: शिखर धवनची वडिलांकडून लाथा-बुक्क्यांनी धुलाई, नेमकं झालं तरी काय झालं..?

 Shikhar Dhawan:                     आयपीएल 2022 (IPL 2022) चे अंतिम सामने खेळवले जात आहेत. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ने कालच्या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये जागा पक्की केली आहे. आता राजस्थान, बंगळुरू आणि लखनौमध्ये फायनलाशी टक्कर होणार आहे. इतर सर्व संघाचे यंदाचे आव्हान संपुष्टात आले आहे. या मोसमाच्या सुरुवातीला पंजाब किंग्स हा संघ खूप मजबूत दिसत होता, परंतु हा संघ देखील प्लेऑफ (Playoff) साठी पात्र ठरू शकला नाही. 


Sport News:- शिखर धवनची वडिलांकडून लाथा-बुक्क्यांनी धुलाई,


           या हंगामात पंजाबचा स्टार फलंदाज शिखर धवन याने पंजाब किंग्ज (Punjab Kings) कडून सर्वाधिक धावा केल्या. पण, तो देखील संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवू शकला नाही. संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर शिखर धवनने सोशल मीडिया (Social media) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिसत आहे. जाणून घ्या या व्हिडीओमागील खर सत्य…


वडिलांकडून धवनला मारहाण 

            पंजाब किंग्स (Punjab Kings) ने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले, परंतु हळूहळू संघाच्या खेळात लक्षणीय घट झाली. खराब खेळामुळे संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. आयपीएल 2022 मधून पंजाब बाहेर पडल्यानंतर शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट (Instagram account) वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फटके खाताना दिसत आहे. त्याला वडिलांकडून लाथा-बुक्क्यांचा मार मिळताना व्हिडिओ दिसत आहे. ही खरीखुरी मारहाण नसून, व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना शिखर धवनने लिहिले की, ‘पंबाज संघ प्लेऑफमध्ये न गेल्यामुळे माझी वडिलांकडून धुलाई.’


15व्या हंगामात 450+ धावा 

              शिखर धवनने या मोसमातील 14 सामन्यांत 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन अव्वल 5 मध्ये राहिला. आयपीएलच्या मागील 3 हंगामात धवनने 500+ धावा केल्या होत्या आणि यावेळी देखील त्याने 450 चा टप्पा पार केला. धवनच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 6244 धावा आहेत. यात 2 शतके आणि 47 अर्धशतके आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!