Soyabean Rate Update : देशात तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या (Soyameal) दरात चढ उतार होत आहेत, दरपातळी मात्र टिकून आहे. तर देशातील बाजारात सोयाबीन भाव (Soybean Bajarbhav) कायम आहेत. आता सोयाबीन दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली.
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दर सुधारलेले आहेत. विशेष म्हणजे हे दर सध्या टिकून आहेत. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा किमान भाव ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान पोचला. तर अनेक बाजारांमध्ये कमाल भाव ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर सरासरी भाव ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांवर होता. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ५५० ते ५ हजार ६५० रुपयांवर होते.
देशातील बाजारात आज जवळपास ३ लाख ६० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आजही महाराष्ट्रातील बाजारात सर्वाधिक सोयाबीन आलं.राज्यात १ लाख ७५ हजार क्विंटलची आवक झाली. तर मध्य प्रदेशात १ लाख २५ हजार क्विंटल आणि राजस्थानधील शेतकऱ्यांनी ३० हजार क्विंटल सोयाबीन विकलं.
👉😞कापूस करतोय शेतकऱ्यांना निराश😞👈
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार होते. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे सायंकाळी ६ वाजेपर्यंत १५.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४९८ डाॅलर प्रतिटनावर होते. सोयातेलानंही ६२.६२ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता.
बाजारात चढ उतार सुरु असले तरी दरपातळी टिकून आहे. सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाची दरपातळी मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे.
Soyabean Rate Update : सोयाबीन बाजाराला आधार
आंतरराष्ट्रीय बाजारात आता खाद्यतेलाचे भाव सुधारत आहेत. इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंधनं घातली. रशियानेही तब्बल पाच महिन्यानंतर सूर्यफुल तेल निर्यातीवर शुल्क लावले.
👉महिलांच्या लाडक्या सोन्याचे भाव👈
यामुळं खाद्यतेलाचे दर सुधारु शकतात. तर देशातून सोयापेंड निर्यातीची गती वाढली. निर्यात सौदेही चांगले झाले. त्यामुळं सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय.
Soyabean Rate Update : किती होऊ शकते दरपातळी?
सध्या सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र सोयापेंड आणि खाद्यतेल बाजाराकडून मिळणारा आधार बघता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी दरपातळी ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकते.
दरात काही वेळा चढ उतारही येऊ शकतात. पण सध्या दरात नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.
Pingback: Onion Market शेतकऱ्यांना किती फसवणार; 10 पोती कांदा विकल्यानंतर 2 रुपयांचा चेक - Krushi Vasant