Sharad Pawar Gramsamruddhi Yojana

Sharad Pawar Gramsamruddhi Yojana :अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Sharad Pawar Gramsamruddhi Yojana महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांचा एकत्रित करून शरद पवार ग्राम समृद्धी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

  • 1) गाय व म्हणी यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
  • 2) शेळीपालनासाठी शेड बांधने.
  • 3) कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
  • 4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • या चार कामासाठी सरकारतर्फे अनुदान दिले जाणार आहे.

कोणत्या प्रकारच्या कामासाठी किती अनुदान दिले जाते.

1) गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे

  • Sharad Pawar Gramsamruddhi Yojana 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येणार आहे.
  • त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाईल.
  • 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिलं जाणार आहे.
Sharad Pawar

रेशनकार्ड धारकांसाठी 2 मोठ्या घोषणा

Sharad Pawar Gramsamruddhi Yojana 2) शेळीपालनासाठी शेडचे बांधकाम करणे.

  • 10 शेळ्यांकरता 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शेळ्यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
  • पण, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान दोन शेळ्या असाव्यात असे या शासन निर्णयात नमूद केला आहे.

कुक्कुटपालनासाठी शेड बांधने.

  • 100 पक्ष्यांकरता शेड बांधायचा असेल तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
  • 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे.
  • जर 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करायची आहे.
  • त्यानंतर यंत्रणें शेड मंजूर करावा आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये शंभर पक्षी अन्न आणणे बंधनकारक राहणार आहे.
4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
  • शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,534 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
Maharashtra Land Right Proofs

एवढा मिळणार खतावर अनुदान सरकारचा निर्णय

अर्ज कसा करायचा
  • Sharad Pawar Gramsamruddhi Yojana योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल.
  • या अर्जाचा नमुना खालील प्रकारे असेल.
  • सुरुवातीला तुम्ही सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात त्यांच्या नावावर टिक करा.
  • त्याखाली ग्रामपंचायतचे नाव तालुका, जिल्हा टाका.
  • दिनांक टाकून फोटो चिटकवा त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, आणि मोबाईल क्रमांक टाका.
  • खाली ज्या कामासाठी अर्ज करणार आहात त्या कामासमोर बरोबरची टिक करा.
  • मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी दिली जाईल.
  • त्यातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोट्याचा काँक्रीटीकरण, शेळी पालन शेड कुक्कुटपालन शेड यापैकी ज्या कामासाठी अनुदान हवे त्या कामासमोर बरोबर टिक करा.
  • या नंतर प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
  • कुटुंबाचा प्रकार निवडा यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रदान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्या प्रकारासमोर बरोबर टिक करा.
  • जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही या अर्जासोबत जोडायचा आहे.
Maharashtra Land Right Proofs

10 वी पास वर 12 हजार + जागा

Sharad Pawar Gramsamruddhi Yojana

  • लाभार्थ्यांची नावे जमीन आहे का असेल तर सातबारा 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना नो.8 जोडा.
  • लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडा.
  • निवडलेले काम आणि रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत असेल तर हो म्हणून टिक करा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील अठरा वर्षावरील पुरुष स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
  • शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंका द्या.
  • यासोबत मनरेगाचा जॉब कार्ड ऑटो सातबारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8 अ हा उतारा सुद्धा जोडावा लागेल.
  • यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्या आणि सरपंच/ ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकार याचा सहीचा शिफारस पत्र द्या.
  • लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
  • त्यात सुरुवातीला ग्रामसभेचा दिनांक ठराव क्रमांक तुमचे नाव कामाचे नाव प्रवर्ग यांचा उल्लेख असेल.
  • त्यानंतर कागदपत्रांची छाननी होईल आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही आणि शिक्क्यानिशी एक पोचपावती दिली जाईल.
  • यात लाभासाठी पात्र आहे की नाही हे नमूद केले जाईल.
  • जर मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच हमी योजनेचा जॉब कार्ड असेल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • जर नसेल तर जॉब कार्ड मिळण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करू शकता.

Income Sources Of Panchayati Raj 2023 :ग्रामपंचायतीकडे पैसे कुठून येतात?

Property Settlement 2023 :वडिलोपार्जित जमीन वाटप

1 thought on “Sharad Pawar Gramsamruddhi Yojana :अर्ज कसा आणि कुठे करायचा?”

  1. Pingback: Sharad Pawar Gram :ग्रामसमृद्धी योजना काय आहे? - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!