Right Time to Drink Milk : गरम दूध प्यावं की ठंड दूध प्यावं? काय आहे जास्त फायदेशीर जाणून घ्या सर्व माहिती…

Right Time to Drink Milk : दूध हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानलं जातं. दूध हे संपूर्ण अन्न मानलं जातं. दुधाचं पौष्टिक मूल्य हे खूप जास्त आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आहारात दूध समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जात असतो. काहींना दुधाची एलर्जी असते त्यांना वगळता दूध हे आहारातील एक उत्तम आणि परिपूर्ण घटक मानला जातो. 


Right Time to Drink Milk : गरम दूध प्यावं की ठंड दूध प्यावं?


        दुधात प्रथिने (Protein), कॅल्शियम (Calcium), झिंक (Zinc), मॅग्नेशियम (Magnesium) यासारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात. अनेकांना गरम दूध प्यायला आवडतं तर काहींना थंड दूध प्यायला आवडत असत. काहीजण साखर मिसळून तर काहीजण साखरेशिवाय दूध पितात. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न उद्भवतो की दूध कसं आणि कधी प्यावं. दूध थंड प्यावं की गरम, सकाळी प्यावं, संध्याकाळी प्यावं की रात्री, अशा काही प्रश्नांची उत्तरं येथे जाणून घेऊयात. 


ऋतूनुसार बदल

             दूध थंड किंवा गरम घ्यावे या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. दूध गरम आणि थंड अशा दोन्ही प्रकारे पिणं फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. या दरम्यन, तुम्ही ऋतूनुसार यात बदल करु शकतात. उन्हाळ्यात थंडपणा मिळण्यासाठी तुम्ही दिवसा थंड दूध पिऊ शकतात. उष्ण वातावरणात थंड दूध प्यायल्यास उष्णतेपासून आराम मिळेल. तसेच हिवाळ्यात रात्री कोमट दूध प्यायल्यानं फायदा होत असतो.मुलांना यावेळी दूध द्यावं

             आयुर्वेदानुसार प्रोढांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ झोपण्यापूर्वी आहे. जर रात्री आपलं शरीर अधिक क्रिया करत नाही. अशावेळी तुमचे शरीर अधिकाधिक कॅल्शियम (Calcium) शोषून घेतं. तर मुलांना नेहमी सकाळी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरासाठी एक ते दोन कप दूध पुरेसं ठरतं. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!