Post Office ची जबरदस्त योजना; 5 वर्षाच्या गुंतवणूकीवर लाखों रुपयांचा फायदा

 नवी दिल्ली: पोस्ट ऑफिस (Post Office) आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना सुरू करीत असते. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत. तुम्हाला देखील सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) चांगला पर्याय ठरू शकते. ज्यामध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळते. म्हणजेच गुंतवणुकीतून तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा मोठा फंड बनवू शकतात. 


वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) 
वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) 


         तुम्ही सेवानिवृत्त असाल, तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तुमची आयुष्यभराची कमाई सुरक्षित करण्यासाठी तसेच चांगला परतावा मिळवण्यासाठी ही योजना खूप चांगला पर्याय ठरू शकते.


           पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) मध्ये खाते उघडण्यासाठी वय 60 वर्षे असावे लागते. या योजनेत फक्त 60 वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वयाचे लोक खाते उघडू शकतात. याशिवाय ज्या लोकांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (Voluntary Retirement Plan) घेतली आहे, ते लोक देखील या योजनेत खाते उघडू शकतात.


        जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजने (Senior Citizen Savings Scheme) त 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर 5 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर वार्षिक 7.4 टक्के व्याजदराने गुंतवणूकदारांना एकूण रक्कम 14 लाख रुपये मिळतील. 


फक्त हजार रुपयांत उघडा खाते

           या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांची रक्कम असणे गरजेची आहे. तसेच 15 लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात ठेवू शकत नाहीत.


           याशिवाय जर तुमचे खाते उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही रोख पैसे देऊन देखील खाते उघडू शकतात. एक लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला चेक द्यावा लागेल.


मैच्योरिटी पीरियड (Maturity period)

            ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) चा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास ही मुदत वाढवताही येऊ शकते. इंडिया पोस्ट वेबसाइट (India Post Website) नुसार, तुम्ही देखील ही योजना मॅच्युरिटीनंतर 3 वर्षांसाठी वाढवू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!