नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याच्या संकेतावर जागतिक बाजारात आता कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी पातळीपेक्षा 18 टक्क्यांनी घसरल्या आहेत. या घसरणी सोबतच, ब्रेंट क्रूड गुरुवारी सुमारे $114 आणि यूएस बेंचमार्क WTI (वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट) $110 प्रति बॅरलवर आले होते.
7 मार्च 2022 रोजी कच्च्या तेलाने प्रति बॅरल $139.13 या 14 वर्षातील सर्वाधिक उच्चांक गाठला होता. पुरवठा संकटाच्या दरम्यान, यूएईच्या राजदूताने सांगितले की ते कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी उत्पादनात वाढ करण्याच्या बाजूने आहेत. या विधानानंतर, ब्रेंट क्रूड $2.53 किंवा 2.28 टक्क्यांनी घसरून $113.67 प्रति बॅरलवर आले आहे. WTI $1.64, किंवा 1.51%, $110.34 वर घसरला आहे.
भारताला मिळेल दिलासा
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याच्या UAE च्या निर्णयाचा भारताला सर्वाधिक फायदा होणार आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. अलीकडेच, कच्च्या तेलाची किंमत ही प्रति डॉलर 139 वर पोहोचली होती, त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फार मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत वाढ न करण्याच्या निर्णयामुळे सरकारी तेल कंपन्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वरच असणार
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला दिसत नाही. आजही भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांच्या वरच आहेत. देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम आजही सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होत आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई मध्ये पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ही 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.79 रुपये प्रति लीटर आहे. आणि त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.