Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेत मांडत आहेत. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शासनानं अधिक अनुदानाची भर घातली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात.

नमो शेतकरी महासन्मान योजने चा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले, “अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत शासनाच्या अनुदानाची भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो”

काय आहे ही योजना?

या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६,००० रुपयांत राज्य सरकार आणखी ६,००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना १२,००० रुपये प्रतिवर्षी मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.यासाठी २०२३-२४ साठी ६,९०० कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. केंद्र सरकारनं २०१६च्या पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यानं भरण्याची तरतूद आहे. आता हा भारही शेतकर्यावर न ठेवता त्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य शासन भरेल. शेतकऱ्याला केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर नोंदणी करता येईल, असंही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.

SBI Mudra Loan : छोट्या मोठ्या व्यवसायासाठी SBI देते 10 हजार ते 10 लाखांपर्यंत लोन

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित

  • 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
  • 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्वसमाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
  • 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  • 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
  • 5) पर्यावरणपूरक विकास

Sheli Palan Yojana: 10 शेळ्या 1 बोकड योजना गट वाटपास सुरुवात

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठ्या घोषणा

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार
  • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.
  • शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
  • या योजनेचा १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार
  • एकात्मिक पीक आधारित आराखडा तयार करणार
  • “नमो शेतकरी महासन्मान योजना निधी” फडणवीसांकडून जाहीर
  • येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाणार
    देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा
  • नागपूर, अमरावती आणि बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, यासाठी २० कोटींचा निधी
  • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार, त्यासाठी ड्रोन आणि उपग्रहाची मदत घेण्यात येणार आहे.
  • केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्यात येणार आहे.एका व्यक्तीला प्रतीवर्षी एका व्यक्तीला मिळणार १८०० रूपये
  • कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्कासाठी सोय करण्यात येणार आहे

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठ्या घोषणा

  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत
  • शेततळे योजनेचा विस्तार करणार
  • मागेल त्याला शेत तळे, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला हरितगृह मिळणार
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू करणार
  • अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपयांची मदत
  • सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद
  • राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाईल
  • बुलढाण्यात संत्रा प्रकल्प प्रक्रियेसाठी ३० कोटींची तरतूद
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर प्रती हेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • जलयुक्त शिवार भाग २ ची योजना फडणवीसांकडून जाहीर महाकृषी अभियान जाहीर
  • मच्छिमारांसाठी ५ लाखांचा विम्याची घोषणा
  • मागेल त्याला ठिबक सिंचन आणि शेततळे योजना
  • पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्वेकडे वळवण्यासाठी भरघोस निधीची तरतूद
  • नदी जोड प्रकल्पासाठी शासनाचा निधी देणार
  • कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना
  • मेंढी पालकांच्या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद
  • ३० टक्के कृषी वाहिन्यांचे सौर उर्जीकरण करणार
  • मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार
  • मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
  • पुढील वर्षात २७ जल प्रकल्प पूर्ण करणार
  • तापी खोऱ्यातील पाणी पातळी महापुनर्भरण प्रकल्पावर लक्ष देणार
  • अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येईल
  • मेंढीपालानासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे
  • मेंढी शेळी पालना करिता १० हजार कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र शेळी व मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापणा करण्यात येणार आहे. त्याचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे.

Panjabrao dakh : 9 मार्च गुरुवारपासून बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्याचे अवकाळी पाऊस येणार

Onion Committee : कांदा समितीच्या २० वर्षांपूर्वीच्या शिफारशींचे झाले तरी काय?

4 thoughts on “Maharashtra Budget 2023 : फडणवीसांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची घोषणा; शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12,000रू. मिळणार”

  1. Pingback: Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक' - Indien Farmer

  2. Pingback: Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा - Krushi Vasant

  3. Pingback: Maharashtra Budget Session 2023 : क्रेडिट संस्थानों में जमाकर्ताओं के लिए शिंदे सरकार का बड़ा ऐलान! - Atharvarohi

  4. Pingback: Maharashtra Budget Session 2023 किसानों को 6000 कैश, गरीबों को 10 लाख घर - Atharvarohi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!