Maha Talathi Bharti 2023 : 3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता – काय आहे नवीन आदेश जाणून घ्या

Maha Talathi Bharti 2023 :

Maha Talathi Bharti 2023 मिळालेल्या नवीन माहिती नुसार, राज्यात लवकरच मोठी तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये 3628 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत होते. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे एकाच तलाठ्याच्या अंगावर अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता. तसेच कामांना फार वेळ लागत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्या भरतीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.

👉100 रु मध्ये शेतीचे मालक व्हा👈

या भरतीमध्ये एकुण 3110 तलाठी व 518 मंडळ अधिकारी यानुसार दोन्ही पदे मिळून एकुण 3628 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार पहा. पुणे विभागामध्ये 602 तलाठी साझे आणि 100 महसूली मंडळे एकूण 702 पदासाठी भरती होणार. अमरावती विभागामध्ये 106 तलाठी साझे आणि 18 महसूली मंडळे एकूण 124 पदासाठी भरती होणार. नागपूर विभागामध्ये 478 तलाठी साझे आणि 80 महसूली मंडळे एकूण 558 पदासाठी भरती होणार. औरंगाबाद विभागामध्ये 685 तलाठी साझे आणि 114 महसूली मंडळे एकूण 799 पदासाठी भरती होणार. नाशिक विभागामध्ये 689 तलाठी साझे आणि 115 महसूली मंडळे एकूण 804 पदासाठी भरती होणार. कोकण विभागामध्ये 550 तलाठी साझे आणि 91 महसूली मंडळे एकूण 641 पदासाठी भरती होणार आहे.

👉ग्वारच्या भाव गगनात👈

मिळालेल्या माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण, पुणे विभागात 3628 पदांची महा तलाठी भरती लवकरच घेण्यात येणार आहे. राज्यामध्ये तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्याने आणि एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये एक बैठक घेतली. या बैठकीला राज्यातील तलाठ्यांना निमंत्रितही केलं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त आहेत, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेला कामासाठी अडचणी येतात.

Maha Talathi Bharti 2023 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांना पदांनुसार पात्रता बारावी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झाले असणे गरजेचं आहे.
  2. अर्जदारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं गरजेच आहे.
  3. अर्जदारांना मराठी, हिंदी, आणि इंग्रजी विषयाचे हे बेसिक अभ्यास असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदारांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि नियमाचे पालन कराव लागणार आहे.

तलाठी पदासाठी वयोमर्यादा किती असेल ?

तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अर्जदाराचे वय 18 ते 40 यादरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गातील असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेमध्ये विश्रांती (Relaxation) देण्यात येणार आहे.

जिल्ह्यानुसार किती पदांसाठी होणार तलाठी भरती

  1. पुणे विभागात एकुण 602 तलाठी साझे आणि 100 महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  2. अमरावती विभागात एकुण 106 तलाठी साझे आणि 18 महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  3. नागपूर विभागात एकुण 478 तलाठी साझे आणि 80 महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  4. औरंगाबाद विभागात एकुण 685 तलाठी साझे आणि 114 महसूली एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  5. नाशिक विभागात एकुण 689 तलाठी साझे आणि 115 महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.
  6. कोकण विभागात एकुण 550 तलाठी साझे आणि 91 महसूली मंडळे एवढ्या पदासाठी भरती होणार आहे.

👉पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

error: Content is protected !!