Latur Market, Soybean prices : सोयाबीन लातूर बाजारभाव, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्रच बदलले

   

latur market soybean

          केंद्र सरकार (Central Government) शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वी देखील तुर आयातीची मुदत वाढविल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावा (Guarantee) पेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरात देखील झपाट्याने घसरण सुरु आहे. मागील आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता मात्र 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आलेले आहेत. 

सोयाबीनची साठवणूक पडली महागात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचे चित्रच बदलले


लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीनला अपेक्षित दर (Expected rate for soybean) मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण आता ती आशाही धुसर होताना दिसत आहे. एवढेच नाही तर सोयाबीन साठवणूक (Soybean storage) केल्याचा पश्चाताप होईल असेच सध्या सोयबीनचे दर आहेत. गेल्या 5 महिन्यात प्रथमच सोयाबीन हे 7 हजार रुपयांच्या खाली आले आहे. नोव्हेंबरपासून 7 हजार रुपये प्रति क्विंटल असेच दर राहिले आहेत. पण गेल्या 8 दिवसांपासून चित्र जरा बदलले आहे. केंद्र सरकार (Central Government) ने सोयापेंडची आयात केल्या कारणाने सोयाबीनची मागणी घटली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी सुरु होताच झालेली दरातील घट शेतकऱ्यांच्या चिंतेचाच विषय राहणार आहे. त्यामुळे दरात लागलीच सुधारणा झाली नाही तर मात्र, नुकसान हे अटळ आहे. 

latur market soybean

केंद्र सराकारकडून सोयापेंडची आयात (Import of soybean from Central Government)

         केंद्र सरकार (Central Government) च्या शेतीमाल आयात धोरणाचा शेतकऱ्यांना कायम फटकाच बसलेला आहे. यापुर्वी देखील तुर आयातीची मुदत वाढविल्या कारणाने दरात मोठी घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दर बाजार पेठेत मिळत आहे. तर आता सोयाबीनच्या दरात देखील झपाट्याने घसरण सुरु आहे. मागील आठवड्यात सोयाबीन 7 हजार 200 रुपयांवर होते तर आता 6 हजार 820 रुपये क्विंटलवर दर आले आहेत. त्यामुळे एवढ्या दिवस साठवणूक करुन उपयोग काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय प्रक्रिया उद्योजकांनी लागेल त्यानुसारच सोयाबीनची खरेदी करुन सोयापेंड (Soybean) चे उत्पादन घेतले होते. पण आता दर घसरल्यामुळे प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन खरेदीलाच ब्रेक लावले आहेत.


उन्हाळी सोयाबीनची धास्ती (Summer soybean scare)

              शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करत यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनवर जास्त भर दिला होता. याशिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्या कारणाने उन्हाळी सोयाबीनमध्ये वाढ होणार आहे. उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर दरात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यंतरी 7 हजार 600 दर असताना ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली त्यांचे चांगले साधले आहे असे म्हणता येईल.


latur market soybean

शेतीमालाच्या दरातच घसरण (Falling prices of agricultural commodities)

         सोयाबीनच्या दरातच घसरण झाली आहे असे नाही तर तूर (Toor) आणि हरभऱ्याचेही (Gram) दर घसरले आहेत. त्यामुळे विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पुन्हा निर्माण झाला आहे. तुरीचे दर 6 हजार तर खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 असा दर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन विक्री शिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे मका (Maize) आणि तुरीची खरेदी केंद्रावर विक्री हाच पर्याय आता शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!