Lampi Virus Skin Disease:- गाई म्हशींवर लम्पीरोग, त्यामुळे दुधाबाबतची ही अफवा समजून घ्या…

 मुंबई :  लम्पी स्कीन (Lumpy Virus Skin Disease) या संसर्गजन्य रोगाने देशात धुमाकूळ घातलेला आहे. जनावरांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने वाढत आहे. महाराष्ट्रात लम्पी स्कीन हा रोग नियंत्रणात असला तरी राजस्थान, मध्यप्रदेश, गुजारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशा या ठिकाणी प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवा पसरवल्या जात आहेत. राजस्थानातील गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा पसरत आहे. परिणामी शहरी भागातील दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासून माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून केले जात आहे. 


Lumpy Virus Skin Diseaseगायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव

               लम्पी (Lumpy Virus Skin Disease) हा एक त्वचा रोग आहे यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडत चालते. एवढेच नाही तर यामुळे जनावराची तहान-भूक देखील कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या रोगाचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहत नाही.


नागरिकांनी घ्यावयाची काळजी 

                 लम्पी स्कीन (Lumpy Virus Skin Disease) हा एक संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काहीही धोका नाही. परंतु, लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे आवश्यक आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासून देखील काहीही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे. 


महाराष्ट्रात काय स्थिती?

                     देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लम्पी स्कीन या रोगाचा धोका कमी आहे. सर्वाधिक नुकसान हे राजस्थान मधील शेतकऱ्यांचे झाले आहे. महाराष्ट्रातील नगर, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील फैलाव झाला आहे. तर राज्यातील 850 जनावरांना लम्पीरोग झाला होता आणि त्यापैकी 590 जनावरे ही बरी झाली आहेत.


राजस्थान मधील 75 हजार जनावरे दगावली

                       लम्पी या रोगाचा सर्वाधिक धोका हा राजस्थान मध्ये निर्माण झाला आहे. या राज्यात 75 हजार गायी-म्हशी दगावल्या आहेत. राजस्थान पाठोपाठ गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांमध्ये देखील प्रादुर्भाव वाढत आहे.

1 thought on “Lampi Virus Skin Disease:- गाई म्हशींवर लम्पीरोग, त्यामुळे दुधाबाबतची ही अफवा समजून घ्या…”

  1. Pingback: Cattle Grazing Land अतिक्रमण हटविण्यासाठी 31 डिसेंबर ही मुदत - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!