Knee Pain Relief : आता वेदनेला म्हणा बाय-बाय; गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

                 हाडे कमकुवत झाल्यामुळे अनेकदा सांधे आणि गुडघे दुखत असतात. अचानक पडल्यामुळे गुडघ्याला दुखापत (Knee Pain) देखील होऊ शकते. कधीकधी गुडघेदुखीचा त्रास खूप दिवस सहन करावा लागतो. यामुळे चालणेही कठीण होते. त्यामुळे दैनंदिन कामे करण्यासोबतच मौजमजा करताना देखील खूप अडथळा येतो (Knee Problems). गुडघ्याच्या वेदनेमुळे आपल्याला अनेक आवडत्या गोष्टी करता येत नाहीत. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही या दुखण्यापासून आता मुक्ती मिळवू शकतात, तेही काही घरगुती उपाय (Home Remedies For Knee Pain) करून. 

         चला तर मग जाणून घेऊयात गुडघेदुखीवर काही रामबाण उपाय. 


Knee Pain Relief : आता वेदनेला म्हणा बाय-बाय
एरंडेल तेल (Castor oil)

           गुडघेदुखीसाठी एरंडेल तेल (Caster Oil) खूप उपयुक्त असते. हे लावल्याने वेदनेपासून खूप आराम मिळतो. यासाठी तुम्ही एरंडेल तेल (Caster Oil) थोडे गरम करून गुडघ्यावर लावू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुडघेदुखी कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा पॅक (Caster Oil Pack) देखील वापरू शकतात. यासाठी गरम पाण्यात एरंडेल तेल मिसळा आणि मग त्यात टॉवेल बुडवून पिळून घ्या. यानंतर हा टॉवेल गुडघ्याभोवती घट्ट गुंडाळा आणि थोडा वेळ विश्रांती द्या. यामुळे वेदना कमी होऊ शकतात. 


कापूर तेल (Camphor Oil)

          गुडघेदुखीसाठी कापूर तेल (Camphor Oil) देखील फायदेशीर आहे. हे तुमचे रक्ताभिसरण वाढवते आणि तुमच्या गुडघ्यावरील ताण आणि इरिटेशन (Knee strain and irritation) दूर करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी एक कप गरम खोबरेल तेलात एक चमचा कापूर पावडर घाला. मात्र ते तेल केवळ थोडे गरम करा उकळू नका. यानंतर तेल थंड झाल्यावर दिवसातून दोनदा याने गुडघ्यांवर मालिश करा. यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा वेदनेपासून आराम मिळतो. 


आईस पॅक (Ice pack)

           अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, बर्फाच्या पॅकमुळे (Ice Pack) तुम्हाला गुडघेदुखीपासून लगेच आराम मिळू शकतो. यामुळे सूज आणि जळजळदेखील कमी होण्यास मदत होते. यासाठी काही बर्फाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा आणि नंतर ते 15 ते 20 मिनिटे तुमच्या गुडघ्यांवर हलक्या हाताने लावा. तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा हा आईस पॅक (Ice Pack) आपल्या गुडघ्यांच्या वेदनेच्या जागेवर लावू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!