Jockey 9218 हरबरा वान /हरबरा सुधारीत वान / हरबरा जाती वैशिष्ट्य…

जाँकी 9218 हराभरा किती दिवसात काढनीला येतो / याच सरासरी उत्पादन किती आहे / या वानाची वैषिप्ट्ये काय आहेत/ कोनत्या जमिनीत या वानाची पेरणी करायला हवी याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसेल, तर हि माहिती आपण जानून घेणार आहोत.

जाँकी 9218 चा कालावधी

या वानाचा कालावधी 105-110 दिवस आहे….. तरीही जमीन आणि पाणी यांचे व्यवस्थापन यानुसार कालावधी कमी किंवा जास्त होत असतो.

कोनत्या जमिनीत पेरणी करावी

हा वान बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीत पेरणीयोग्य आहेत. तसेच उशिरा पेरणीसाठी सुद्धा याची निवड करू शकतात.

Jacky 9218 या वानाची वैशिष्ट्य

टपोरे दाने असलेला हा वान असून 100 दान्याचं वजन सरासरी 24-26 ग्रँम एवढे भरते. टपोरे दाने आणि पिवळसर तांबूस रंगामुळे या वानाला चांगला बाजारभाव मिळतो. हा वान मर रोगास प्रतीकारक्षम आहे, मर रोगाचं प्रमाण या वानाचं खूप कमी आहे आणि यामुळेच हा वान लोकप्रिय झाला आहे. कोरडवाहू/बागायती दोन्ही प्रकारच्या जमीनीत पेरणी करता येते आणि भरपूर उत्पादन मिळते.

या वानाच प्रायोगिक उत्पादन हे हेक्टरी 30-32 क्विंटल एवढे आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी या वानाचं 08 ते 12 क्विंटल उत्पादन घेऊन शकतात. जर टोकन लागवड आणि योग्य नियोजन केले तर यापेक्षा अधिक जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. या वानाच्या जवळपास 40-60% घाट्यामध्ये एकच दाना/बि असते. त्यामुळे टपोरे आणि गोलाकार दाने या वानाचे आसतात. ईतर वान जसे विजय/दिग्विजय या वानाच्या 60% घाट्यामध्ये 02 दाने आसतात त्याप्रमाणे या वानात पहायला मिळत नाही. हा वान महाराष्ट्र राज्यासाठी तयार करन्यात आलेला वान आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणात पेरणी केला जानारा हा वान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!